चिंचोली मोराची – दिनांक ३ जुलै चिंचोली मिरची ( ता.शिरूर) येथे ग्रामपंचायत व नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानने आयोजित १ जुलै ते ७ जुलै वन महोत्सव कार्यक्रमा निमित्त वुक्षवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम आज संपन्न झाला. निसर्गाशी सानिध्य जपत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर , माहिती सेवा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, चिंचोली मोराचीचे उपसरपंच राहुल नाणेकर, ञिदल सैनिक संघटना चिंचोली मोराची शाखाध्यक्ष शामराव धुमाळ ,पत्रकार विठ्ठल वळसे , संभाजी गोरडे ,गणेश सातव ,पोलीस अधिकारी वाघ साहेब, सामाजिक कार्यकर्ते गणेश धुमाळ, शरद धुमाळ, छाया उकिर्डे, काळुराम उकिर्डे,राहुल नाणेकर, सावळा धुमाळ,कु.सागर येवले, शितल नाणेकर,आरती नाणेकर,प्रमिला धुमाळ,भारती धुमाळ,प्रियंका धुमाळ, रंजनी कदम,नवनाथ नाणेकर, महादेव उकिर्डे मान्यवर उपस्थित होते.