Saturday, July 27, 2024
Homeस्थानिक वार्ताचिंचोली मोराची येथील तंटामुक्ती अध्यक्ष पदी वामन नाणेकर यांची बिनविरोध निवड

चिंचोली मोराची येथील तंटामुक्ती अध्यक्ष पदी वामन नाणेकर यांची बिनविरोध निवड

चिंचोली मोराची – चिंचोली मोराची ( ता.शिरूर) येथील तंटामुक्ती अध्यक्ष पदी वामनराव नाणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या तंटामुक्त समितीच्या कार्यकरणी निवडीचा विषय ग्रामसभा मध्ये मांडण्यात आला.यामध्ये गावातील सर्व उपस्थित ग्रामस्थांनी ग्राम सभेत चर्चा करून गावातील प्रतिष्ठित नागरिक वामन नाणेकर यांची सर्वानुमते तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ग्रामसभेत जल जीवन मिशन,वन समिती,कोविड लसीकरण या विषयावर ग्रामस्थ सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी चिंचोली मोराची गावचे सरपंच अशोकराव गोरडे, उपसरपंच राहुल नाणेकर, ग्रामसेवक संतोष गिरी,गाव कामगार तकाठी अशोक बडेकर, चेअरमन,व्हाईस चेअरमन,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सोसायटीचे सर्व सदस्य व गावातील सर्व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशन व शिवभिमान कला क्रीडा मंच यांनी तंटामुक्ती अध्यक्ष बिनविरोध निवड चे स्वागत केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!