Monday, June 17, 2024
Homeइतरचिंचोली मोराची मध्ये ञिदल आजी -माजी सैनिक संघटना शाखेचे भव्य उद्घाटन व...

चिंचोली मोराची मध्ये ञिदल आजी -माजी सैनिक संघटना शाखेचे भव्य उद्घाटन व निवृत्त सैनिकांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा संपन्न

प्रतिनिधी. पोपट उकिर्डे

शिरूर : दिनांक २६ मार्च

चिंचोली मोराची ( ता.शिरूर) येथे ञिदल आजी -माजी सैनिक संघटना शाखेचा उद्घाटन व निवृत्त सैनिकांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा पार पाडला.शाखा उद्घाटनासंघटनेचे संस्थापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष संदिपभाऊ लगड व प्रवक्ता एस के आठरे यांच्या हस्ते करण्यात आले. शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

चिंचोली मोराची येथे त्रिदल आजी माजी सैनिक संघटना शाखेचे उद्घाटन व निवृत्त सैनिकांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा नुकताच उत्साहात पार पाडला . संघटनेचे संस्थापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप लगड यांच्या अध्यक्षतेखाली शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

चिंचोली गावचे भूमिपुत्र मेजर विठ्ठल शामराव नाणेकर व मेजर अशोक सुखदेव गोरडे हे नुकतेच सैन्यदलातुल देश सेवा करुन आपल्या जन्मभुमीत परत आले त्यानिमित्ताने गावच्या वतीने भव्यदिव्य स्वागत, मिरवणूक काढण्यात आली.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महिला आघाडी भारती लगड , तालुकाध्यक्षा उज्वला इचके , त्रिदल सैनिक सेवा संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड रेश्मा चौधरी , पुणे जिल्हा सचिव बाळासाहेब नवले , जिल्हा संपर्क प्रमुख विठ्ठल जगताप , जिल्हा सहसचिव सुनील चौहान , शिरूर तालुकाध्यक्ष बबन पवार , उपाध्यक्ष विठ्ठल जाधव , संपर्क प्रमुख चंद्रकांत लांडगे , सल्लागार इंद्रभान सरोदे असे सुमारे १५० त्रिदल सैनिक संघटना पदाधिकारी व सैनिक परिवार उपस्थित होते .

यावेळी प्रथम सैनिक स्व . विष्णु सावळाराम उकिर्डे यांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला . यावेळी गावचे आजी माजी सरपंच , उपसरपंच , पोलीस पाटील गाव शाखा संघटनेचे अध्यक्ष राजेश नाणेकर , उपाध्यक्ष सावळा धुमाळ , सचिव प्रकाश नाणेकर , सहसचिव संतोष नाणेकर , कार्याध्यक्ष विठ्ठल नाणेकर , सहकार्याध्यक्ष अशोक गोरडे , खजिनदार जगन्नाथ धुमाळ , सहखजिनदार भाऊसाहेब गोरडे , संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख मारूती थोपटे , शामराव धुमाळ , धुमाळ , सल्लागार विठ्ठल राव सहसल्लागार अशोक गोरडे , संचालक मिनीनाथ नाणेकर , संचालक पोपट महाजन , संचालक दादाभाऊ पोखरकर , संचालक अण्णासाहेब मिडघुले , संचालक प्रताप गोरडे , सैनिक मिनीनाथ धुमाळ , किसन गोरडे यांच्यासह आजी माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!