Monday, June 17, 2024
Homeस्थानिक वार्ताचिंचोली मोराची गावचे शुभम साळे यांनी रस्त्यावर सापडलेली रक्कम मूळ मालकाचा शोध...

चिंचोली मोराची गावचे शुभम साळे यांनी रस्त्यावर सापडलेली रक्कम मूळ मालकाचा शोध घेत केली परत

शुभम साळे यांच्या प्रामाणिक पणाबद्दल ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कडुन सत्कार

शिरूर – मोराची चिंचोली (ता.शिरूर) गावच्या एका युवकाने रस्त्यावर सापडलेली १६६०० रुपयांची रक्कम प्रामाणिक परत केली, या प्रामाणिकपणामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत आहे.

चिंचोली गावचे शुभम साळे हे काही कारणास्तव आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर ते मादळवाडी या रस्त्याने दुचाकी वरून जात असताना त्यांना रस्त्यावर काही पैसे पडल्याचे दिसले त्यांनी हे पैसे उचलले.इतरत्र चौकशी केली पण तपास लागत नव्हता.ही रक्कम मोजल्यावर त्यांना समजले की सोळा हजार सहाशे रुपये आहे. रक्कम सापडलेले तिचा मालक जवळपास नाही अशा वेळी त्यांना ती रक्कम स्वतःजवळ ठेवणे शक्य होते पण त्यांच्यातील प्रामाणिकपणा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता कोणाचे पैसे पदके असतील याचा ते शोध घेत होते. कोणाचे रुग्णालयाचे बिल आहे की कुटुंबाच्या गरजेचे आहे या विचाराने अस्वस्थ झाले होते अशा वेळी त्यांनी त्यांच्या मिञ परिवार व सोशल नेटवर्क व्हॉट्सॲप ला सर्व प्रकार सांगितला व रक्कमेची खरी ओळख सांगुन रक्कम ज्यांची आहे त्यांनी घेऊन जाणे असा संदेश सर्वञ पसारित केला.

ज्या व्यक्ती चे पैसे हरवले आहे त्यांना हा संदेश काही वेळातच भेटला. त्यांनी शुभम साळे यांना संपर्क साधुन खाञी करून पैसे घेतले. शुभम साळे यांच्या प्रामाणिकपणावर संपुर्ण चिंचोली गावतुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर हे विद्याधाम विद्यालय कान्हुर मेसाई मध्ये आज गणेशोत्सव व्याख्यानमाला साठी आले होते.त्यांना हा प्रकार कळाला व त्यांनी शुभम साळे यांचा सत्कार केला.असा प्रामाणिकपणा खुप कमी पाहावयास मिळतो.नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशन ने ही त्यांचे कौतुक केले व सत्कार करण्यात येणार आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!