Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याचंद्रकांत पाटील यांना अमोल मिटकरी यांचं खुले आवाहन.....

चंद्रकांत पाटील यांना अमोल मिटकरी यांचं खुले आवाहन…..

खरे शिवभक्त असाल तर माझ्यासोबत पाणी न पिता रायगड चढून दाखवा ,राज्यपाल पायी शिवनेरी किल्ला चढले म्हणजे काय उपकार केला नाही हा राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न आहे.आज आम्ही आत्मक्लेश यासाठी करतोय की जर आम्ही आता शांत बसलो तर पुढच्या पिढ्या आम्हाला दोष देतील व आम्हाला सोडणार नाहीत.

कोरेगाव भीमा – वढु बुद्रुक ( ता.शिरूर) काल भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या वयात शिवनेरी किल्ला चालत सर केला त्या राज्यपालांच्या मनात शिवरायांच्या बद्दल अनादर कसा असेल असा सवाल केला. यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे. राज्यपाल पायी गेले तर काही उपकार केले नाहीत. जर खरे शिवभक्त असतील तर चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा आमदारांना आव्हान आहे की, पाचाड पासून राजसदर आहे तिथपर्यंत रायगडावर माझ्यासोबत पाणी न पिता पायी चढवून दाखवावं आणि मग महाराजांच्या विषयी मनात किती आस्था आहे ते सांगावं. राज्यपाल पायी गेले तर काही उपकार नाही केले त्यांनी. हा निव्वळ राज्यपालांना वाचवायचा प्रकार असल्याचं आमदार मिटकरी म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यामार्फत  संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वढूमध्ये आत्मक्लेश करण्यात आला यावेळी आमदार अमोल मिटकरी, आमदार अतुल बेनके,आमदार संदीप शिरसागर आदी नागरिक उपस्थित आहे.यावेळी ते बोलत होते.

भारतीय जनता पक्ष्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध जी अनास्था आहे ती राज्यपाल भगतसिंह कोशारी, सुधांशु त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांच्या तोंडून जनतेने ऐकली आहे. आज आम्ही इथे शिवप्रेमी म्हणून आलेलो आहोत. जस उदयनराजे रायगडावर भाजपचे म्हणून गेलेले नाहीत तर शिवरायांचे एक वंशज म्हणून गेलेले आहेत.अस देखील यावेळी मिटकरी म्हणाले. आज आम्ही आत्मक्लेश यासाठी करतोय की जर आम्ही आता शांत बसलो तर पुढच्या पिढ्या आम्हाला दोष देतील. चुकून वक्तव्य झालं असेल तर समजू शकतो मात्र हे वारंवार जाणूनबुजून केले जात आहे. हे लोक इतके निर्लज्ज, मस्तवाल आहेत की दिल्लीतील कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुधांशु त्रिवेदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी केली नाही. मंगलप्रभात लोढाने देखील राजीनामा दिला नाही. हे जर असच सुरू राहील आणि आम्ही फक्त पाहत राहिलो तर आमच्या आगामी पिढ्या आम्हाला सोडणार नाहीत अस देखील यावेळी मिटकरी म्हणाले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!