Wednesday, September 11, 2024
Homeस्थानिक वार्ताग्राहक कल्याण फाऊंडेशनची मासिक बैठक संपन्न

ग्राहक कल्याण फाऊंडेशनची मासिक बैठक संपन्न

कदमवाकवस्ती – दिनांक १४ सप्टेंबर

हवेली तालुका प्रतिनिधी सुनील थोरात

कदमवाकवस्ती : ग्राहक कल्याण फाऊंडेशनची हवेली तालुका मासिक बैठक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. वस्तू खरेदी करणे, घेतलेली वस्तू तपासणी करणे, बदलून मिळणे या ग्राहकाला सेवा देणे बंधनकारक आहेत. ग्राहक संघटित नाहीत या असंघटित असलेल्या ग्राहकांच्या सेवेसाठी मार्गदर्शनासाठी ग्राहक कल्याण फाऊंडेशन हवेली तालुक्यात सक्रिय वाटचाल करत आहे.

हवेली च्या बैठकीला राज्य सदस्य असलम तांबोळी, पुणे जिल्हा अध्यक्ष नरहरी गांजवे, पुणे जिल्हा सचिव सतिश थिटे, पुणे जिल्हा सदस्य पोपट साठे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी संघटना बांधणी आणि ग्राहकांचे हक्क अधिकार व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यकर्त्याला माहिती असणे गरजेचे शेतकरी व ग्राहकांची पिळवणूक थांबवणे हेच ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे कार्य असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी हवेली तालुकाध्यक्ष सुनिल थोरात, स्मिता बाबरे, लक्ष्मी गायकवाड, कचरु कड, नंदकुमार चव्हाण, श्याम नाईक व आदी कार्यकर्ते हजर होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!