Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याग्राम सेवक रतन दवणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येऊन ग्राम पंचायतीची चौकशी...

ग्राम सेवक रतन दवणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येऊन ग्राम पंचायतीची चौकशी करण्यात यावी – प्रहार अपंग क्रांती संघटना

दिवाळी सण गेला होऊन अपंग निधीचे  पैसे आले मागून, कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीचे वराती मागून घोडे

 ग्रामसेवक रतन दवणे यांचे निलंबन व कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीची चौकशी यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या समोर करण्यात येणार बोंबाबोंब आंदोलन

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील ग्रामसेवक रतन रामराव दवणे यांनी ऐन दिवाळी सणामध्ये अपंग बांधवांना अपंग निधी जमा केल्याचे खोटे सांगत महाराष्ट्र बँक व पि डी सी सी बँकेत चकरा मारायला लावत त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या ग्रामसेवक रतन दवणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी व कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीची चौकशी करण्यात यावी यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेने पत्रव्यवहार करत कारवाईची मागणी करण्यात आली असून याबाबत पुणे जिल्हा परिषदेसमोर मनगटावर चुना लावून बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  स्वराज्य राष्ट्र च्या बातमीची दखल घेत तातडीने निधी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण व शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके यांचे आभार मानले असून सरपंच विक्रम गव्हाणे यांनी तातडीने निधी जमा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

   प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने जानेवारी २०२३ पासून अपंग निधीबाबत पत्रव्यवहार करण्यात येत असून निदान दिवाळी तरी गोड व्हावी व आपलीही दिवाळी गोड साजरी व्हावी यासाठी अपंग बांधवांनी ग्रामसेवक रतन दवणे यांना विनंती केली असता त्यांनी निव्वळ तोंडी आश्वासने दिली कधी महाराष्ट्र बँकेत तर कधी पि डी सी सी बँकेत पैसे जमा केल्याचे सांगत त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामसेवक रतन दवणे व ग्राम पंचायत कोरेगाव भिमा यांच्या कारभाराचा निषेध म्हणून मनगटावर चुना लावून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.याबाबत प्रसार माध्यमांनी दिव्यांग बांधव व ग्रामसेवक रतन दवणे यांची बाजू मांडल्याने वरिष्ठ गट विकास अधिकारी महेश डोके व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी तातडीने दखल घेत निधी जमा करण्यात बाबत सकारात्मकता दाखवत माणुसकीची संवेदनशीलता जपल्याने तातडीने सोमवारी दिनांक २० नोव्हेंबर रोजी अपंग निधी जमा करण्यात आला. 

   दिवाळी सण गेला होऊन अपंग निधीचे  पैसे आले मागून, कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीचे वराती मागून घोडे असा कारभार पाहायला मिळाला असून दिवाळी झाल्यावर अपंग निधी जमा झाला असला तरी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही.

याबाबत प्रहार अपंग क्रांती संघटना आक्रमक झाली असून ग्रामसेवक रतन रामराव दवणे अपंगांशी खोटे बोलून अपंग निधी जमा करण्यात  आल्याचे खोटे बोलून पदाचा गैरवापर करत जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यात टाळाटाळ करणे, पदाचा गैरवापर करत आमचा अपंगत्वाचा गैरफायदा घेण्याचा प्रयन्त करत निधी न देणे त्यासाठी अपंगांशी खोटे बोलने, अमानवी व निंदनीय प्रकार करण्यात आला आहे. ग्रामसेवक निव्वळ फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत, अपंगांना निधी देण्यास टाळाटाळ, कर्तव्यात कसूर, कार्यलयीन कामकाज संहितेचे उल्लंघन, दिव्यांगांना फसवण्यासाठी पदाचा गैरवापर करणे, आर्थिक प्रयत्न करणे, दिव्यांग कायद्याचे उल्लंघन करणे, दिव्यांगांना न्याय न देता त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी व आर्थिक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्याबर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात येऊन ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी प्रहार अपंग क्रांती संघटनेने पत्राद्वारे मागणी केली आहे.

जोपर्यंत ग्रामसेवक रतन दवणे यांच्यावर कारवाई होत नाही व ग्राम पंचायतीची चौकशी होत नाही तोपर्यंत प्रहार अपंग संघटना संघर्ष करणार आहे तसेच लवकरच जिल्हा परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष कुंडलिक वायकुळे यांनी दिली.

निधी शिल्लक नसल्याने रक्कम जमा करता आली नाही. दिव्यांग बांधवांचा निधी जमा केला आहे. – ग्रामसेवक रतन दवणे 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!