Monday, October 14, 2024
Homeताज्या बातम्याग्रामपंचायत शिक्रापूर येथे संत रोहिदास महाराजांना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर

ग्रामपंचायत शिक्रापूर येथे संत रोहिदास महाराजांना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा जागर

शिक्रापूर (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री संत रोहिदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संत रोहिदास यांच्या जीवनाचा व विचटनाचागोवा घेण्यात आला.

   प्रतिमेचे पूजन आदर्श सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सीमा लांडे यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर,उषा राऊत, प्र. ग्रंथपाल संतोष काळे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश घारे, गणेश सासवडे, स्वप्निल मांढरे, चंद्रशेखर दरवडे, विशाल लोखंडे, अनिल दिघे, गणेश लांडे, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायकवाड, जयश्री निंबाळकर,रूपाली राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

विचार आणि शिकवण
 १) संत रोहिदास महाराज यांनी गुण-निर्गुण, शहाणपण, सामाजिक न्याय, एकता, समानता याबद्दल त्यांनी समाजाला शिकवण दिली. 
२) ‘मन चंगा तो कठौती मैं गंगा’ हा त्यांचा लोकप्रिय हिंदी दोहा आहे. यात ते म्हणतात की, ”माणसाचे मन पवित्र असेल, त्याला जातीयवादाचा स्पर्श झाला नसेल तर चांभाराच्या कुंडातही गंगाजलाच पावित्र्य दिसून येते, त्यासाठी आपला दृष्टीकोन तसा असायलाहवा. 
३) संत रोहिदास यांनी भारतभर फिरून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे धडे देत देशाला अध्यात्मिक आणि समाजिक उंचीवर नेले. संत रोहिदास महाराज यांचा मृत्यू उत्तरप्रदेश येथील चित्तोडगड येथे झाला. १५४० त्यांनी जगाचा निरोप घेतला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!