प्रतिनिधी सुनील थोरात हवेली
कदमवाकवास्ती – कदमवाकवस्ती ( ता.हवेली) येथील गोल्डन सियारा पब्लिक स्कूल मध्ये खाद्य पदार्थांची जत्रा भरली. कदमवाकवस्ती येथील गोल्डन सियारा पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शैलेश चंद यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान समजावे. या उद्देशाने स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक व आर्थिक ज्ञान मिळावे यासाठी खाद्य जत्रेचे आयोजन केले होते. यावेळी विविध मूलांनी पालकांच्या मदतीनी खाद्द पदार्थ तयार करुन आणले होते. मोठया प्रमाणात या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष शैलेश चंद ,उपाध्यक्ष रमेश चंद ,खजिनदार अर्जुन चंद, सचिव सुप्रिया चंद, संचालक़ सुमन चंद ,प्राजक्ता चंद, मुख्याध्यापक प्रिती खणगे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.