प्रतिनिधी सुनील थोरात
हवेली : कदमवाकवस्ती ( ता.शिरूर) ग्रामपंचायत मध्ये गोल्डन सियारा पब्लिक स्कूलचे वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी अश्विनी माळी व स्कूल कमिटी चेअरमन शैलेश चंद, उपाध्यक्ष रमेश चंद, खजिनदार अर्जुन चंद, मुख्याध्यापिका प्रीती खणगे आदी मान्यवर उपस्थित होते. स्कुल मधील विद्यार्थ्यांचा खेळा बाबतीत उत्साह पाहून सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सध्याच्या काळात मैदाने खेळाला किती महत्त्व आहे. याचे मार्गदर्शन करण्यात आले. स्कूलमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत. अशा शुभेच्छा आलेल्या सर्व मान्यवरांनी दिल्या. गोल्डन सियारा पब्लिक स्कूलचे वार्षिक क्रीडा महोत्सव क्रीडा प्रशिक्षक हेमंत डोईफोडे, नवनाथ वाघमारे यांच्या मार्गदर्शनात होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पाटील यांनी केले. सर्व शिक्षक सेवक वृंद विद्यार्थी पालकांनीव विद्यार्थी यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग दर्शवला.