Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्यागुणवत्ता व शिक्षणातील दर्जा असाच राखला तर सणसवाडी येथील जिल्हा परिषद ...

गुणवत्ता व शिक्षणातील दर्जा असाच राखला तर सणसवाडी येथील जिल्हा परिषद शाळा (वसेवाडी) राज्यात गौरवास्पद राहील  – आमदार अशोक पवार

सणसवाडी येथे ९ वी ते १२ वी पर्यंतचे  वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न करणार – शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी 

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार व सन्मान  करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल लेझीम गजरात आमदार पवार यांचे स्वागत केले तर यावेळी विद्यार्थ्यांनी मॅटवर कुस्तीचे प्रात्यक्षिक दाखवले तसेच  विज्ञान प्रदर्शन दाखवले यावेळी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ करण्यात आला.

     पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्याचे ४२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले त्यामध्ये सणसवाडी येथील शाळेचे २२ विद्यार्थी – विद्यार्थिनि झळकले असून येथील गुणवत्ता व शिक्षणाचा उत्तम दर्जा राखल्यास ही शाळा राज्यात नावलौकिक मिळवेल असे गौरवोद्गार आमदार अशोक पवार यांनी काढले.यावेळी शिक्षक व मुख्याध्यापक संतोष गोसावी यांच्या ज्ञानदान कार्याचे कौतुक केले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे संचालक संपत सूर्यवंशी यांनी सणसवाडी ग्रामस्थांची ९ वी ते १२ वर्ग सुरू करण्याची मागणी असून याबाबत शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

सणसवाडी येथील जिल्हा परिषद शाळा वसेवाडी शाळेच्या गुणवंत  विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी आमदार अशोक पवार यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती तर विद्यार्थिनींनी लेझिमच्या तालावर आमदार पवार व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कुस्तीचे व विज्ञानाच्या प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखवले.

    यावेळी  आमदार अशोक पवार,  माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे संचालक संपत सूर्यवंशी,  शिक्षण अधिकारी  वाखारे, शिरूरचे गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर ,  माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे अधिक्षक राजेन्द्र साठे, सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, मार्केट कमिटी माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर,  राजणगाव गणपती देवस्थानचे अध्यक्ष व माजी उपसरपंच विजयराज दरेकर, काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, मोहन हरगुडे, ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, माजी सरपंच सुरेश हरगुडे, माजी उपसरपंच गणेश दरेकर, माजी सरपंच गोरक्ष भुजबळ, प्रशांत दरेकर, निलेश दरेकर, अशोक दरेकर, अलका दरेकर, किरण हरगुडे, सागर हरगुडे, रामदास हरगुडे, मोहन हरगुडे, बाळकृष्ण दरेकर, विठ्ठल दरेकर, सुभाष दरेकर, संतोष शेळके अशोक करडे, अनिल गोटे, शाळा समिती अध्यक्ष अमोल हरगुडे, उपाध्यक्ष अमोल दरेकर, शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी सर व अन्य मान्यवर उपस्थित होते

या शाळेत परप्रांतीय विद्यार्थी गिरवतात मराठीचे धडे – सणसवाडी हे औद्योगिक वसाहतीचे व मोठी लोकसंख्या असलेल्या गावात परप्रांतीय व इतर भाषिक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर आहे. ही मुले मराठी माध्यमातील शाळेत शिकत असून उत्तम मराठी बोलत आहेत तसेच मराठी माध्यमातील शिक्षणासह येथील विविध ज्ञान अंगिकारत असल्याने येथील मध्यामिक शाळेत परप्रांतीय व पर्भाशिक विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत असून हे  शाळेचे  अनोखे वैशिष्ट्य असून येथे मराठी भाषा गौरव वाढवला असून मराठी माध्यमातील  शिक्षणाचे महत्व अधोरेखित होत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!