Saturday, May 25, 2024
Homeसाहित्य/सामाजिकसंस्कृतीगुजर प्रशाले तर्फे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांस अभिवादन

गुजर प्रशाले तर्फे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांस अभिवादन

तळेगाव ढमढेरे – दि.०९ ऑगस्ट

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतर्फे क्रांती दिनानिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रशालेतील बँड पथकामार्फत तसेच सर्व विद्यार्थ्यांची मिळून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात बँड पथका मार्फत मिरवणूकही काढण्यात आली.याप्रसंगी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.

यावेळी माजी सैनिक आनंदराव ढमढेरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले तसेच तळेगावच्या प्रथम नागरिक सरपंच अंकिता भुजबळ व उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ यांच्या हस्ते हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनी सायली मुळे व यश ससाने या विद्यार्थ्यांनी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या विषयी माहिती सर्वांना सांगितली. स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , सामाजिक कार्यकर्ते संदीप ढमढेरे ,विजय ढमढेरे माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी आढाव यांनी केले.या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर ,मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ,ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे आदींनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!