Friday, May 24, 2024
Homeशिक्षणसंस्कारगुजर प्रशालेत कुमार जयसिंगराव ढमढेरे यांचा २५७ वा स्मृतिदिन साजरा

गुजर प्रशालेत कुमार जयसिंगराव ढमढेरे यांचा २५७ वा स्मृतिदिन साजरा

तळेगाव ढमढेरे – दिनांक १२ ऑगस्ट तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत कुमार जयसिंगराव ढमढेरे यांचा २५७ वा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे व तळेगाव ढमढेरे नगरीचे सामाजिक कार्यकर्ते अनिल ढमढेरे यांच्या हस्ते कुमार जयसिंगराव ढमढेरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

पानीपत संग्रामात सरदार ढमढेरे परिवारातील सरदार अनाजी ढमढेरे, सरदार येसाजी ढमढेरे यांच्यासह ढमढेरे घराण्यातील विरांची एक पिढी धारातिर्थी पडली.तळेगांवात सरकार वाड्यात एकही सरदार वीर राहिला नव्हता.याच वेळेस राघोबा दादा पेशवे यांनी निजामावर चालून जाण्याचे ठरवले आणी रिवाजाप्रमाणे मोहिमेत सहभागी होण्याचे आदेश नजरचुकीने तळेगाव ढमढेरेला पोहोचले.आणी आपल्या एकूलत्या एक १४वर्षीय सरदार जयसिंगराव ढमढेरे यांना घेऊन आईसाहेब शनिवारवाड्यावर दाखल झाल्या.मराठ्यांच्या मोहिमेत ढमढेरे नाहीत असे होणार नाही आमच्या जयसिंगरावांना मोहिमेत नेण्याची विनंती राघोबा दादांना केली त्यानूसार जयसिंगराव मोहिमेत सहभागी झाले.राक्षसभूवन येथे निजामासोबत मराठ्यांचा रणसंग्राम झाला.हि मोहिम मराठ्यांनी जिंकली परंतु या रणसंग्रामात सरदार ढमढेरे परिवारातील १४वर्षीय सरदार जयसिंगराव ढमढेरे हे धारातिर्थी पडले होते.त्यांच्या पराक्रमाच्या स्मृतींचा जागर करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे उपशिक्षक शिवाजी आढाव यांनी कुमार जयसिंगराव ढमढेरे यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती दिलीकार्यक्रमप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण ,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे ,पर्यवेक्षक मोहन ओमासे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर मानद सचिव अरविंद ढमढेरे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे आदींनी शुभेच्छा दिल्या.फोटो ओळ – कुमार जयसिंगराव ढमढेरे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!