Wednesday, April 24, 2024
Homeक्राइमगहाण ठेवलेले दागिने घेऊन वाघोलीतील सराफ फरार

गहाण ठेवलेले दागिने घेऊन वाघोलीतील सराफ फरार

हवेली तालुक्यातील शिरसवडी येथील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या नितीन सुभाष क्षीरसागर वर लोणीकंद पोलीस स्टेशनच्या गुन्हा दाखल

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) केसनंद ते राहु रोडवरील शिरसवडी येथे त्याने महालक्ष्मी ज्वेलर्स (Mahalakshmi Jewellers) नावाने सराफी दुकान सुरु केले. लोकांना नविन दागिने बनवून देतो, असे सांगून त्यांच्याकडील जुने दागिने व पैसे घेतले.दागिने गहाण ठेवून उसने पैसे दिले, त्यानंतर तो सर्व काही घेऊन फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune  Crime News)

स्वराज्य राष्ट्र

याबाबत अमोल कुंडलिक पायगुडे (वय ३२, रा. पायगुडे वस्ती, वाडेबोल्हाई, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १७५/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन सुभाष क्षीरसागर (रा. शिवरकर वस्ती, वाघोली, मुळ रा. कुरंदा, ता. वसमत, जि. हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईने ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व ८० हजार रुपये हे ५ तोळे वजनाच्या बांगड्या बनविण्यासाठी डिसेबरमध्ये आरोपी क्षीरसागरकडे विश्वासाने दिल्या. परंतु, क्षीरसागरने नवीन बांगड्या बनवून दिल्या नाहीत. तसेच गावातील काही लोकांनी आरोपीकडे सोन्याचे दागिने देऊन दागिन्यांच्या किंमतीपेक्षा कमी पैसे उसने घेतले. लोकांचे हे दागिने घेऊन क्षीरसागर दुकान बंद करुन फरार झाला आहे. अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर लोकांनी आता पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पुढील तपास करीत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!