Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याखेड तालुक्यातील वाफगाव येथे आकाशातुन अज्ञात वस्तु थेट जमिनी वर येताना पँराशुट...

खेड तालुक्यातील वाफगाव येथे आकाशातुन अज्ञात वस्तु थेट जमिनी वर येताना पँराशुट फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

संबधित उपकरण हवामान विभागाचे असून कोणताही धोका नसल्याची माहिती हवामान विभागाने पत्राद्वारे दिली.

खेड – वाफगाव ( ता.खेड) येथे आकाशातुन अज्ञात वस्तु थेट जमिनिवर येत असताना पँराशुट फुटले व त्याच्या आवाजाने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून सेटेलाईटच्या निरिक्षकाचे उपकरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून संबधित वस्तू पोलिसांनी पंचनामा करत ताब्यात घेतली आहे.

  या उपकरणावर कोरियन भाषेत आढळुन आलेय त्यामुळे काही हेरगिरीचे उपकरण असल्याचा अंदाज करण्यात येत आहे.खेड तालुक्यातील वाफगाव या गावामध्ये आकाशामधून अचानक एक उपकरण असल्यासारखी वस्तू जमिनीवर पडली ती पडत असताना या वास्तूला असलेला बलून फुटल्यामुळे मोठा आवाज झाला . यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना  आवाज आल्यामुळे त्यांच्यात कुठेतरी भीतीचे वातावरण पसरले होते पण हवामान विभाग व पोलीस यंत्रणेच्या खुलाशामुळे कसलाही धोका नसल्याची माहिती देण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
याबाबत सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार खेड  दि३१ मे  रोजी सकाळा ०८.३० वा चे  वाफगाव येथील  टाकळवाडी रोड येथील भरत शांताराम राम्हाणे यांचे शेतात आकाशातुन एक छोटेसे मशिन पडले असून त्याला पांढरे रंगाचा धागा व पुढे पांढरे रंगाचा फुगा आहे अशी माहिती  पोलीस हवालदार साबळे,  शेळके व पोलीस कॉन्स्टेबल बांडे यांना मिळाली असता संबधित पोलीस कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी प्रत्यक्षात त्या मशिन जवळ जावुन पाहणी केली असता ते मशिन हवामान विभागाचे असावे असा प्राथमीक अंदाज करण्यात आला.
 पोलीस कमरचाऱ्यांनी संबंधितांनी मशिनचे संपुर्ण फोटो काढुन मशिनची बारकाईने पाहणी केली असता सदरचे मशिन हे रेडीओसोंड डीटीआर ( RADIOSONDE DTR - WxR 301D) मशिन होते व ते हवामान मोजण्याचे मशिन असल्याची  खात्री झाल्यानंतर ते मशिन  ताब्यात घेतले.
      सदर मशिनचेबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक   यांना व हवामान विभाग पुणे यांना माहिती दिली व हवामान विभाग पुणे यांना लेखी पत्राव्दारे कळविले. त्याबाबत हवामान विभागाचे अधिकारी टी. सी. मोहाडीकर यांनी सदरचे मशिन हे आमचे विभागाकडील असुन ते तापमान, हवामानातील आद्रता, हेवचा दाब, उंची, हवेची दिशा, हवेचा वेग मोजण्यासाठी वापरण्यात येते ते जमिनीपासुन ३५ ते ४० किलोमीटर वर आकाशामध्ये कार्यक्षेत्रात काम करत असते ते आमचे दैनदिन कामकाजातील भाग आहे त्या मशिनपासुन कोणताही धोका नसुन ते परत वापरण्यास आयोग्य आहे असे त्यांनी लेखी पत्राव्दारे कळविलेले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!