तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर)
शेतकऱ्यांचे पी एम किसान योजनेचा निधी सर्व लाभार्त्याना मिळावा यासाठी शासनाने ३१ ऑगष्ट पर्यंत दिलेली मुदत वाढवत ७ सप्टेंबर केली परंतु तरीही केवासी करायचे राहिलेले लाभार्थी हे केवासी करण्यासाठी उत्सुकता दाखवत नसल्याचे निदर्शनास येत आहे.आज खेड उपविभागीय कृषीविभागाचे तंत्र अधिकारी शिरीषकुमार भारती यांनी तळेगाव ढमढेरे येथील श्रीनाथ कॉम्पुटर या महा ई सेवा केंद्रास भेट देत कामाचा आढावा घेतला तसेच तळेगाव ढमढेरे येथील ४०० च्या आसपास लाभार्थी ईकेवासी प्रलंबित असून त्यासाठी प्रचार प्रसिद्धी करावी असे भारती यांनी सांगितले. तर कृषी सहाय्यक रोहिणी चौधरी यांनी पी.एम.किसान सन्मान निधीची भौतिक तपासणी यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध केली असून या यादीमधील लाभार्थ्यांनी कागदपत्रे कृषीमित्र यांस्कडे जमा करावीत. लाभार्थ्यांनी ईकेवायसी न केल्यास या योजनेचा वर्षाला मिळणारा सहा हजार रु लाभ मिळण्यापासून वंचित राहू शकता असे चौधरी यांनी सांगितले.