मिलिंद लोहार सातारा
सातारा – सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलंअॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती व सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिसांत आॉक्टोबर २०२० मध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सातारा पोलिसांनी अॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस ठाण्यात हजर केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. तूर्तास न्यायालाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली असून सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकील अंजुम पठाण यांनी पोलिसांची बाजू मांडली. यावेळी पोलिसांनी वृत्त वाहिनीच्या चर्चा सत्रात केलेले वक्तव्य हे कोणाच्या सांगण्यावरून केले आहे. त्याची चौकशी करणे आणि आवाजाची तपासणी यासाठी पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. तर ॲड सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी युक्तिवाद करताना पोलिसांनी दिलेल्या नोटीसवर दिनांक नाही. त्यामुळे सातारा पोलिसांनी केलेली अटक ही कायदेशीर प्रक्रियेत नाही. सरकारकडून हे प्रकरण रंगवून पुढे आणले जात आहेत. यात राजकीय हस्तक्षेप आहे, असा आरोप केला.