Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याखासदार डॉ अमोल कोल्हे देणार खासदारकीचा राजीनामा .....

खासदार डॉ अमोल कोल्हे देणार खासदारकीचा राजीनामा …..

इंस्टाग्राम व ट्विटरवरून साहेब सांगतील ते धोरण ,साहेब सांगतील ते तोरण, सगळ विसरायचं असतं पण बाप नाही विसरायचं, बाप शेवटी बाप असतो म्हणत मी साहेबांसोबत असे जाहीर करत शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलं आहे. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून राजीनामा देणार असल्याची माहिती खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिली दिली.

पुणे – गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होताना दिसत आहे.राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी थेट आपण खासदराकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहिर केल्याने अनेकांसह राष्ट्रवादीतील नेत्यांना धक्का बसला आहे.( MP Dr Amol Kolhe will resign from MP)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाच्या निर्णयानंतर राज्यभरासह ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP)महाभूकंप झाला असून त्याचे विविध स्तरातून वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासोबत जायचे की अजित पवार यांना पाठिंबा द्यायचा या द्विधा मनस्थितीत राष्ट्रवादीचे नेते,आमदार व कार्यकर्ते अडकले असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यात काही नेत्यांकडून आमचा चक्रव्यूहातील अभिमन्यू झाल्याचे बोलले जात असून राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचे अत्यंत धाडसी विधान केले आहे.

डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये,खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलं आहे. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी खासदारकी पदाचा राजीनामा देणार आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन मी त्यांना माझा राजीनामा सोपवणार आहे.त्याच काय करावं ते त्यांनी ठरवावं असं म्हटलं आहे.'(In Shirur Lok Sabha Constituency, people have voted with faith. Therefore, I am going to resign from the post of MP so as not to break the trust of the people. I will go to Sharad Pawar’s Silver Oak residence and hand over my resignation to him)

पुढे बोलताना ते (Amol Kolhe) म्हणाले, ‘मी माझ्या कामानिमित्त अजित पवारांना भेटायला गेलो होतो. तिकडे शपथविधी होणार याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. त्या ठिकाणी गेल्यावर मला याबद्दल माहिती मिळाली. राजकारणामध्ये मी लोकांचा विश्वास तोडण्यासाठी आलो नाही.’सध्या सुरू असलेल्या राज्यकारणात मी माझी भूमिका कशी बदलू शकतो, असं देखील डॉ.अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) म्हणाले आहे. अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून शरद पवार अमोल कोल्हे यांचा हा राजीनामा स्वीकारतील का? असा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अमोल कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे बोलले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात पुन्हा खळबळ माजली आहे. बाप शेवटी बाप असतो अस ट्विटरवर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील एक प्रसंग शेअर करत मी साहेबांसोबत असा ट्विटरवर डी पि ठेवला असून मी कायम शरद पवारसाहेब यांच्यासोबतच असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

https://twitter.com/kolhe_amol/status/1675784887692042242?s=20

https://www.instagram.com/reel/CuOn-laJhttps://www.instagram.com/reel/CuOn-laJUrO/?igshid=MzRlODBiNWFlZA==UrO/?igshid=MzRlODBiNWFlZA==

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!