Sunday, November 3, 2024
Homeकृषिखळबळजनक ….. शेतात मायलेकराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू…

खळबळजनक ….. शेतात मायलेकराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू…

कोल्हापूर – (Kolhapur Crime)) पन्हाळ्याच्या (panhala)पायथ्याशी नेबापुर गावामध्ये विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मायलेकराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. नंदा गुंगा मगदूम व अजिंक्य गुंगा मगदूम अशी मृत्यूमुखी पडलेल्या आई व मुलगा यांची नावे आहेत.(Sensational …..Mother and son died on the spot due to electric shock in the field…)

पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर गावामध्ये माय लेकराचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची खळबळ जनक घटना घटना घडली आहे. (Sensational …..Mother and son died on the spot due to electric shock in the field…)

नेहमीप्रमाणे तो आजही शेतात कामासाठी सकाळी सातच्या सुमारास गेला होता. तासभर काम करून घरी परतणारा मुलगातास दोन तासांत तो परत येईल अशी अपेक्षा होती. पण तो आला नसल्याने अजय अजून कसा घरी परतला नाही? या चिंतेत असलेल्या आईने मुलगा फोन केला. मात्र, फोन न उचलल्याने त्या पाहण्यासाठी शेतात गेल्या तेव्हा त्यांना अजिंक्य तेथे पडलेला दिसला. नंदा यांनी आरडाओरडा केला. त्या अजिंक्यला उचलण्यासाठी गेल्या असता त्याही शेजारी पडल्या.
आरडाओरडा ऐकून शेजारच्या लोकांनी शेताकडे धाव घेतली असता दोघेही विद्युत तारेचा जोरदार धक्का लागल्याने मृत्यू पावल्याचे दिसून आले. पन्हाळा एम एस सी बी अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट देत पाहणी करत पुढील कार्यवाही करत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!