Monday, September 16, 2024
Homeक्राइमखळबळजनक... शिरूर तालुक्यात चुलती व पुतण्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

खळबळजनक… शिरूर तालुक्यात चुलती व पुतण्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

शिरूर – शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला परिसरात चुलती व पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. कल्पना रवींद्र शिंदे (वय ३१) व सचिन दौलत शिंदे (वय २४, रा. दोघेही, गणेगाव दुमाला, ता. शिरूर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेने शिरुर तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे व गोविंद ज्ञानदेव शिंदे (दोघेही रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.(Shirur Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेगाव दुमाला ग्रामपंचायत हद्दीतील संगमेश्वर वस्ती परिसरात कल्पना रवींद्र शिंदे तसेच सचिन शिंदे कुटुंबियांसोबत राहत होते. रविवारी (ता. ४) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसताना कल्पना शिंदे यांनी घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असतानाच सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा पुतण्या सचिन दौलत शिंदे (वय २४) यानेही घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.(Pune Gramin Police)

दरम्यान, याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात दौलत शिंदे व गोविंद शिंदे यांनी माहिती दिली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतिराव गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संपत खबाले व पोलीस नाईक अमोल गवळी हे करीत आहेत.(Shirur Police Station)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!