Monday, June 17, 2024
Homeइतरखळबळजनक…बहिणीला पळवून नेल्याचा जाब विचारल्याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याने एकजण जखमी

खळबळजनक…बहिणीला पळवून नेल्याचा जाब विचारल्याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याने एकजण जखमी

शेनपुजी रांजणगाव येथील घटना, एकजणाच्या पायावर गोळी लागल्याने थोडक्यात बचावला असून जखमी झालं आहे.

वाळूज – छत्रपती सभाजी नगर येथील वाळूज भागातील रांजणगाव शेणपुजी येथे गोळाबारीची घटना समोर आली आहे. बहिणीला पळवून नेल्याचा जाब विचारल्याने गावठी कट्ट्यातून ही गोळीबार करण्यात आला असून, यात एकजण थोडक्यात बचावला आहे. मात्र गोळी पायावर लागल्याने एकजण जखमी झाला आहे. (Sensational…One person injured after firing from Gavathi Katta after asking him to answer for abducting his sister)या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर श्रावण सुरेश पिंपळे (रा. नायतळा ता. निफाड जि. नाशिक) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ( Crime News)

   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाळूजच्या रांजणगाव शेणपुजी परिसरात राहणाऱ्या फिर्यादीच्या चुलत बहिणीला श्रावण पिंपळे हा दोघांच्या मदतीने पळवून घेऊन गेला होता. दरम्यान, यावरून २५ जुलै रोजी पिंपळे याने फिर्यादीच्या भावाला फोनवर संपर्क केला असता शिवीगाळ केली. दरम्यान, यावेळी श्रावणला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता तो अचानक फिर्यादीच्या घरी आला. तसेच फिर्यादीच्या भावाला मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. मात्र जीव वाचवण्यासाठी त्यांनी तिथे असलेला शटर बंद केला. मात्र बंद शटरमधून गोळी आरपार जाऊन फिर्यादीच्या गुडघ्याला लागल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ( Sensational...One person injured after firing from Gavathi Katta after asking him to answer for abducting his sister) याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

परिसरात खळबळ…
वाळूजच्या रांजणगाव शेणपुजी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. वाळुज औद्योगिक वसाहतीत गुंडाची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी  होत आहे. त्यात गोळीबाराच्या घटनेने पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवर वचक राहिला का नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.(Crime News)

वाळूज औद्योगिक वसाहतीत वाढली गुन्हेगारी –
वाळूज औद्योगिक वसाहतीत मोठी एमआयडीसी असल्याने या ठिकाणी गेल्या काही वर्षात राहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परराज्यातून कामानिमित्त येणाऱ्या कामगारांची व महाराष्ट्रातील वेगेवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून या भागात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहेत.
या परिसरात अवैध धंदयांचे प्रमाण वाढले आहे तसेच या भागात गुंडगिरी करणाऱ्या तरुणाईच्या अनेक टोळ्या सक्रीय आहेत. छोटे-मोठे वाद झाल्यावर थेट तलवारी, लाठ्या, काठ्या बाहेर निघतात. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच भागात जमिनीच्या वादातून तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यात आता थेट गोळीबाराची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.(Crime News)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!