रस्त्यावर उखलेले दगड,पडलेले खड्डे , नागरिक,शेतकरी यांना प्रवास करताना करावी लागते तारेवरची कसरत
कोरेगाव भिमा – पिंपळे जगताप (ता.शिरूर) येथील भारत गॅस कंपनी समोरील रस्त्याची अत्यंत वाईट दुरवस्था झाली येथून प्रवास करताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा आणि उडणारा नुसताच धुराळाच धुराळा अशी रस्त्यांची अत्यंत वाईट दुरावस्था झाली असून येथून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिक व शेजारी कामगार यांना तारेवरची कसरत जीव मुठीत धरून करत प्रवास करावा लागत आहे.
सणसवाडी ते पिंपळे जगताप असा भारत गॅस व इतर कंपन्याशेजारील रस्त्याची अत्यंत वाईट दुरावस्था झाल्याने येथे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या खड्ड्याच्या रस्त्याने वाहन चालवताना वाहकांना, कामगार, शेतकरी यांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावरून शेकडो गाड्या भारत गॅस कंपनीच्या जात असून कामगार बस व इतर वाहने जात असतात.
याबाबत पिंपळे जगताप ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे, उपसरपंच रेश्मा कुसेकर, ग्राम पंचायत सदस्य पंडित थिटे, शुभांगी शेळके, सागर शितोळे, दिपाली तांबे, अनिता दौंडकर, संदीप जगताप, अशोक वाडेकर, सुनीता बेंडभर यांनी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
सणसवाडी ते पिंपळे जगताप हा भारत गॅस कंपनीसमोरील रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा अन्यथा याठिकाणी निषेध म्हणून रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे.- सरपंच सोनल अशोक नाईनवरे, पिंपळे जगताप