Monday, June 17, 2024
Homeइतरखटाव तालुक्यातील बोंबाळे येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न

खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न


मिलिंदा पवार वडूज सातारा
सातारा – खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न झाली. या गावांमध्ये नवसाच्या बगाडाची प्रथा आहे. गेली २ वर्ष कोरोना संसर्गजन्य आजार यामुळे ही प्रथा बंद होती .आता कोरोनाचा प्रार्दू भाव कमी झाल्यानंतर ग्रामस्थ यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे. यावर्षी 20 पेक्षा अधिक लोकांनी यात सहभाग घेतला आहे त्यांना सुतार, पाटील आणि इतर बलुतेदार सहकार्य करत असतात. मातंग समाजास या बगाड फिरवण्याचा मान आहे. आत्तापर्यंत 21 बगाड झाली पहिला बगाड घेण्याचा मान पाटील वाड्यास असतो.
खेळणी, पाळणे, मेवा मिठाई ची दुकाने मोठ्या प्रमाणावर आली होती तर चाकरमान्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती भेरवनाथाचा रथ दर्शनासाठी ठेवण्यात आला होता . भाविक रथाचे दर्शन घेऊन भाविकांनी देणगी अर्पण केली आहे. याशिवाय गुलालाची उधळण आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवाचा छबिना काढण्यात आला .यात्रा कमिटी ग्रामपंचायत, सोसायटी पदाधिकारी आणि मान्यवर कार्यकर्त्यांनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!