सभापती राजेंद्र नरवडे व पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर यांनी पुष्प गुच्छ देत केला सत्कार
कोरेगाव भिमा – खंडाळे (ता.शिरूर) येथील विविध विकास सहकारी कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संपत दत्तोबा नरवडे यांची बिनवरोध निवड झाल्याबद्दल सभापती राजेंद्र नरवडे , पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, खरेदी विक्री संघाच्या संचालिका सुजाता नरवडे यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.
खंडाळे येथील विविध कार्यक्रम सोसायटीच्या चेअरमनपदाचा गुलाब नरवडे यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले त्या जागी संपत नरवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने चेअरमनपदी त्यांची बिनविरोध निवडक करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी अप्पासाहेब धायगुडे यांनी तर मदतनीस म्हणून सचिव दिलीप पुणेकर यांनी काम पाहिले.
यावेळी व्हॉईस चेअरमन छाया नरवडे, शरद नरवडे,विशाल नरवडे,भास्कर नरवडे, नवनाथ दरवडे,सुभाष दरवडे, शहाजी नळकांडे,देवराम नरवडे,रणजित नळकांडे, विश्वंभर नरवडे, गणेश नरवडे, तज्ञसंचालक रविंद्र नळकांडे, तेजस नरवडे, उद्योजक निलेश दरेकर, प्रा.अनिल गोटे उपस्थित होते.