Friday, June 21, 2024
Homeसाहित्य/सामाजिकसंस्कृतीक्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे पुतळ्याला तळेगाव ढमढेरेत अभिवादन

क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे पुतळ्याला तळेगाव ढमढेरेत अभिवादन

तळेगाव ढमढेरे दिनांक ९ ऑगस्ट

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) क्रांतीदिनानिमित्त गावातील ग्रामस्थ,शालेय संस्था,भारतीय माजी सैनिक संघटना शिरूर ,हुतात्मा माजी सैनिक संघटना तळेगाव ढमढेरे,शासकीय पदाधिकारी,ग्रामपंचायत यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे हे जन्मभूमी असणाऱ्या गदर संघटनेचे प्रणेते हुतात्मा विष्णु गणेश पिंगळे यांच्या पुतळ्याला तळेगाव ढमढेरे येथील स्मारकात गाववासीयांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

सकाळी ८ वा पावसाची रिमझिम अखंड सुरु असतानाही आर.बी गुजर प्रशाला व समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालय,जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थांनी गावात भारतीय तिरंगा फडकावत ,घोषणा देत प्रभात फेरी काढली.त्यानंतर हुतात्मा विष्णु गणेश पिंगळे स्मारकात गावकरी,ग्रामपंचायत , तालुक्यातील माजी सैनिक व शालेय विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हुतात्मा विष्णू गणेश पिंगळेच्या स्मृतीस्तंभास सलामी देण्यात आली.

कार्यक्रमानिमित्त शिरूर हवेलीचे कार्यशील आमदार अशोक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.स्मृतीस्तंभाचे पूजन सरपंच अंकिता भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिरूर कृषीउत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुदीप गुंदेचा,उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ,माजी उपसरपंच विजुपाटील ढमढेरे,राकेश भुजबळ ,नवनाथ ढमढेरे,ग्रा.सदस्य स्वाती लांडे,गोविंद ढमढेरे ,सुरेश भुजबळ ,पोलीस पाटील पांडुरंग नरके,प्रा.सुधीर बाळसराफ,माजी चेअरमन शिवाजीराव भुजबळ , वसंत भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते संदीप ढमढेरे,बाळासो लांडे,अनिल ढमढेरे,प्रमोद फुलसुंदर ,संपत ढमढेरे ,भरत भुजबळ,कामगार तलाठी ज्ञानेश्वर भराटे ,ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे ,मुख्याधापक सुवर्णा चव्हाण,जयवंत भुजबळ,बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.

तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या वतीने क्रांतीदिना निमित्त पिंगळे यांच्या स्मारकात रंगरंगोटी,परिसर स्वच्छता ,किरकोळ डागडुजी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तर हुतात्मा विष्णु गणेश पिंगळे स्मारकाचा ३७ लक्ष रु दुरुस्तीचा विकास आराखडा पुणे जिल्हा नियोजन समितीस पाठविला असून हा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ यांनी मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!