Friday, July 26, 2024
Homeशिक्षणक्रांतिकारकांचे जीवन आणि विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी -प्राचार्य बेनके

क्रांतिकारकांचे जीवन आणि विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी -प्राचार्य बेनके

शिक्रापूर – क्रांतीकारकांचे जीवन आणि विचार प्रेरणादायी असल्याचे मत श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा (ता.शिरूर) येथे क्रांतीदिनी शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांनी व्यक्त केले. . क्रांती दिनानिमित्त क्रांतिकारक सुखदेव, राजगुरू, भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्राचार्य बेनके यांनी क्रांतीकारकांचा संघर्षमय जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी आपला प्राण दिला नवीन पिढीला त्यांच्या त्यागाची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी विद्यालयात ९ऑगष्ट रोजी क्रांती दिवस साजरा केला जातो.

यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांतीकारकांच्या जयघोषाने परीसर दणाणून सोडला.स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना विद्यालयातही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संभाजी कुंटे, संतोष हिंगे,दिलीप वाळके, अंबादास गावडे, नितीन गरूड,शरद शेलार, मच्छिंद्र बेनके,लक्ष्मण हरिहर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!