Saturday, July 27, 2024
Homeस्थानिक वार्ताकोरेगाव भीमा - वढू बुद्रुक येथे होणाऱ्या पुलाची आमदार अशोक पवार यांच्याकडून...

कोरेगाव भीमा – वढू बुद्रुक येथे होणाऱ्या पुलाची आमदार अशोक पवार यांच्याकडून पाहणी

पुलाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोरेगाव भीमा – छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाकडे जाणारा कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) ते श्री क्षेत्र वढू बुद्रुक रस्त्याचे काम सुरू असून याची पाहणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे.

            कोरेगाव भीमा ते वढु बुद्रुक रस्त्यावरील किऑन कंपनीजवळ ७५ लक्ष रुपये निधीच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असलेल्या पुलाची पाहणी करण्यात आली असून सदर पुलाचे काम करताना रस्त्याचे वळण काढून उतार देखील काढण्यात येणार आहे . पुलाचे काम गुणवत्तापूर्ण करण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचना आमदार अशोक पवार यांनी यावेळी केल्या.

कोरेगाव भीमा ते श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील रस्त्याचे काम सुरू असून किऑन कंपनीजवळ पुलाचे काम सुरू अल्झाले आहे तसेच तीन किलोमिटर रस्त्याचे व पुलाचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यासाठी आमदार अशोक पवार लक्ष देत आहेत.

   छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या विकासाबाबत आमदार अशोक पवार यांचे काम सुरू असून याबाबत छञपती संभाजी महाराज भक्त आग्रही आहेत. 

      यावेळी आमदार अशोक पवार व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

         

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!