Monday, June 17, 2024
Homeइतरकोरेगाव भीमा येथे सामाजिक कार्यकर्त्या राजश्री भांडवलकर यांचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात

कोरेगाव भीमा येथे सामाजिक कार्यकर्त्या राजश्री भांडवलकर यांचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात

जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे ,सभापती मोनिका हरगुडे यांच्यासह पाचशे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सभापती मोनिका हरगुडे

कोरेगाव भीमा. – कोरेगाव भीमा. ( ता.शिरूर) येथे सामाजिक कार्यकर्त्या राजश्री भांडवलकर यांनी महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी महिलांना आरोग्य विषय मार्गदर्शनपर आले . कोरेगाव भीमा येथील पाचशे महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून या कार्यक्रमाचे आयोजन राजश्री महेंद्र भांडवलकर यांनी केले होते.

हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी महिलांना वाण म्हणून निरंजन वाटप करून प्रत्येक महिलेने आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा व नकारात्मक विचारांचा नाश करून सकारात्मक विचारांनी कुटुंब आणि समाजाचे उत्तरदायित्व जपत आपल्या चांगल्या व सकारात्मक कार्याचा प्रकाश सर्वत्र पाडण्यासाठी प्रयत्न करावा असे मत सामाजिक कार्यकर्त्या राजश्री भांडवलकर यांनी मत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे , सभापती मोनिका हरगुडे , वढू खुर्द गावच्या सरपंच मोहिनी भोंडवे, यांच्यासह कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या सदस्या व बचत गटांच्या अध्यक्षा व महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!