Thursday, October 10, 2024
Homeक्राइमAccident कोरेगाव भीमा येथे रात्री साडेतीन वाजता स्विफ्ट कारचा भीषण अपघात

Accident कोरेगाव भीमा येथे रात्री साडेतीन वाजता स्विफ्ट कारचा भीषण अपघात

स्विफ्ट गाडी रोडच्या खाली पन्नास ते साथ फूट खाली जात पलटी झाली असून गाडीच्या दोन्ही एअर बॅग ओपन झाल्या होत्या तर गाडीची काच फोडून जखमींना जीवदान देण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) koregaon Bhima येथील भीमा नदी पुलावरील उजव्या बाजूकडील वळणावर रात्री साडे तींचा सुमारास एका स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला यावेळी गाडीच्या एअर बॅग ओपन झाल्या होत्या असून पुणे नगर हायवेपासून गाडी साधारणतः पन्नास ते साठ फूट खाली खड्ड्यात वेगाने पलटी झाली असून अपघातात जखमी झालेल्या तरुणाला ग्रामस्थांनी अक्षरशः काच फोडून बाहेर काढत जीवदान दिले आहे.There was a terrible accident of a swift car, this time the air bags of the car were open and the car overturned in a ditch about fifty to sixty feet below the Pune city highway.

कोरेगाव भीमा ( koregaon Bhima) येथे पुण्याकडून नगरकडे( pune Nagar Highway) जाणाऱ्या बाजूने रात्री साडेतीनच्या सुमारास वेगाने एक स्विफ्ट (MH १२ TK ३९७६) वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला वेगात खाली गेली यावेळी गाडीने पलटी खाल्ली व पन्नास ते साथ फूट गाडी खाली घसरत गेली यावेळी गाडीच्या पुढील भागातील एअर बॅगा ओपन झाल्या होत्या पलटी झालेल्या गाडीतील एका तरुणाची मान खिडकीच्या काचेत अडकली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते खंडू चकोर, प्रवीण अशोक कोल्हे व आणखी दोन नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी तरुणांचा जीव वाचवला.

या अपघातात ऋषिकेश यादव (वय ३५) शिरूर,एकनाथ शिंगाल (वय ३३) रा.वाघोली हे जखमी झाले असून शिक्रापूर येथील लंघे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Terrible accident of Swift car at night in Koregaon Bhima )

अपघातातील मदत करण्यासाठी १०८ नंबर पोचली पाऊण तासाने – कोरेगाव भीमा येथील अपघात स्थळी मदतीसाठी गेलेल्या खंडू चकोर यांनी सांगितले की तरुणांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी १०८ नंबरवर कॉल केला होता त्यावेळी पाऊण तासाने अँब्युलन्स आली याचे कारण अँब्युलन्स वाहकाला विचारले असता गडीच्या खराब पाठ्यांचे कारण देत यायला उशीर झाल्याचे सांगण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांना वेळेवर मदत मिळणार नसेल व पाऊण तास वाट पाहावी लागणार असेल तर १०८ च्या सेवेविषयी बोलायचं काय ? आणि कोणाच्या भरवश्यावर रुग्णांनी राहायचे असा प्रश्न पडत असून आता १०८ स्वतःची सुविधा वेळेत उपलब्ध करून देणार की रुग्णांच्या जीवाशी खेळ होणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!