Wednesday, September 11, 2024
Homeशिक्षणकोरेगाव भीमा येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न

कोरेगाव भीमा येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न

वीस वर्षांनी भरला स्नेहमेळावा

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा( ता.शिरूर) येथील
श्री छत्रपती संभाजी हायस्कूल येथे २१ जानेवारीला इयत्ता दहावी बॅच २००२-२००३ यांचा माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन चा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकमेकांशी संवाद साधत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रम प्रसंगी कोरेगाव भिमाचे नवनिर्वाचित सरपंच विक्रम गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या बापूजींच्या ब्रीद वाक्याने करण्यात आली.

वीस वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमा च्या निमित्ताने पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात भेटले व आपल्या जुन्या आठवणीत रमले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने  माजी शिक्षक हरिश्चंद्र आवारे सर तसेच शाळेतील प्राचार्य  कुंभारकर सर तसेच  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था पुणे जिल्हा चे विभागीय सदस्य नारायणराव एकनाथ फडतरे, आदरणीय वर्षा वाजे मॅडम ,वृषाली काळभोर मॅडम यांनी कार्यक्रमासाठी  प्रमुख उपस्थिती होते. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक व माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या जून्या आठवणींना उजाळा देत शाळेचा व विद्यार्थ्यांचा अजून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण एकत्वाने मदत करण्याबाबत आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी दिले आहे.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी वनिता फडतरे /आढाव व दत्तात्रय शिवले यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत माजी विद्यार्थी व कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे व माजी सरपंच अमोल गव्हाणे यांनी उपस्थित मान्यवरांचे व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  योगदान दिलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे  आभार व्यक्त केले.
 खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय उत्तम रित्या कार्यक्रम संपन्न झाला माजी विद्यार्थी प्रतिनिधी  नागेश गव्हाणे व  गणेश फडतरे यांनी आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!