कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील ढेरंगे वस्तीवरील पिर महाराज यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
कोरेगाव भीमा व ढेरंगे वस्तीवरील भाविकांनी शेरा , गलप पिर महाराजांना अर्पण करत चपाती मलिदा भाविकांना वाटप केला.तसेच काही भाविकांनी देवाला नारळाचे तोरण बांधले.तसेच अन्न प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ढेरंगे वस्ती रस्ता ते पीर महाराज दर्गा येथील रस्त्यावर लाईट बसवल्याने सायंकाळी व रात्रीच्यावेळी भाविकांना दर्शनासाठी जने सुलभ झाले होते तसेच वर्षभर शेतकरी बांधवांना शेतीच्या कामासाठी या लाईटचा मोठा उपयोग होणार आहे.
भाविकांनी दर्गा व परिसरास आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. पीर महाराजांच्या दर्गा परिसरात रंगरंगोटी करण्यात आली होती. २१ डिसेंबरला सायंकाळी ढेरंगे वस्ती फाटा ते पीर महाराज मंदिर अशी ग्रामस्थांच्या व भाविकांच्या वतीने शेरा व गलप यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात होती.
यावेळी माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य संदीप ढेरंगे, ग्राम पंचायत सदस्य,महेश ढेरंगे, शरद ढेरंगे, रेखा तानाजी ढेरंगे,माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे,माजी चेअरमन बाबुशा ढेरंगे, उद्योजक म्हस्कु शिवले, सीताराम ढेरंगे, पोपट शिवले, भाऊसाहेब मारुती ढेरंगे,गणपत ढेरंगे, अंबादास बनसोडे, माऊली ढवाण, किरण ढेरंगे ,अनिल ढेरंगे, भानुदास ढेरंगे, अप्पा चौधरी ,प्रतीक ढेरंगे, ऋतुराज ढेरंगे, मारुती ढेरंगे, आर्यन सासवडे, प्रथमेश ढेरंगे, मच्छिंद्र कोतवाल, यश कोतवाल, दत्तात्रय ढेरंगे, चैतन्य ढेरंगे, इस्माईल चाचा, मान्यवर उपस्थित होते.