पुणे नगर महामार्ग ठरतोय मृत्युचा सापळा
कोरेगाव भीमा येथील वाडा पुनर्वसन येथे स्विफ्ट डिझायर व दुचाकी अपघातामध्ये एका युवकाचा मृत्यू तर त्याला वैद्यकीय मदत देण्यासाठी येणाऱ्या रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी चालक ठार तर रुग्णवाहिका चालक व त्याच्या शेजारील आणखी एक जखमी झाला असून पुणे अहमदनगर महामार्ग मृत्युचा सापळा ठरतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरेगाव भीमा – दिनांक २६ जानेवारी
कोरेगाव भिमा येथे दिनांक २५ डिसेंबर रोजी रात्री १० च्या दरम्यान वाडा पुनर्वसन फाट्यावरील छञपती ऑटो गॅरेज समोर येथे महेश राजाराम गव्हाणे हे त्यांची हिरो मोटारसायकलला (एम एच १२ व्ही डी १३९३) अहमदनगर बाजूकडून येणाऱ्या स्विफ डिझायर ( एम एच १२ एस बाय १९९० )या गाडीवरील चालक शंकरसन श्रीनरहरी राऊत (रा.लोहगाव पुणे) याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने महेश गव्हाणे याचे मोटारसायकलला अपघात होऊन महेश गव्हाणे यांचा मृत्यू झाला.
महेश गव्हाणे यांच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या मदतीसाठी येणाऱ्या रुग्णवाहिकेची सणसवाडी गावचे हद्दीत कल्पेश वनज काटयाजवळ रुग्णवाहिकेच्या चालकाचे वैभव गजानन डोईफोडे( रा.बजरंगवाडी, शिकापुर, ता.शिरूर ) गाडीवरील गाडीवरील नियंत्रण सुटल्याने श्रीकांत सुर्यकांत उबाळे (वय २६ वर्ष ,रा.ढेरंगेवस्ती कोरेगाव भिमा) यांच्या मोटारसायकलला (एम एच १२ डी डब्ल्यु ६०७३ )धडक बसल्याने अपघातामध्ये मयत झाला तसेच रुग्णवाहिका चालकासह त्याच्या शेजारी बसलेले अक्षय रविंद्र बनसोडे जखमी झाले आहेत.
याबाबत महेश गव्हाणे यांच्या अपघाताबाबत संतोष काळुराम गव्हाणे यांनी फिर्याद दिली असून श्रीकांत उबाळे यांच्या अपघाताबाबत प्रशांत सूर्यकांत उबाळे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.