स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा( ता.शिरूर) येथे सणसवाडी येथील किंबर्ली प्रा. लि. येथील कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी सुहास दरेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना, मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ ,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कोरेगाव भीमाचे माजी सरपंच संदीप ढेरंगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात येऊन केक कापण्यात आला.याप्रसंगी कोरेगाव भीमा , डिंग्रजवाडी व वाडा पुनर्वसन येथील मित्रपरिवार उपस्थित होता.
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी किंबर्ली क्लार्क प्रा. लि.अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने सुहास दरेकर यांचे अभिनंदन केले.
कामगारांच्या हक्काचं नेतृत्व ,अभ्यासू ,हुशार व हसतमुख असणारे व कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे सुहास दरेकर आहेत.त्यांच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सुटण्याबरोबर कामगाराचे कल्याण होईल अशी अपेक्षा व्यक्त करून भावी वाटचालीस कोरेगाव भीमाचे माजी सरपंच संदीप ढेरंगे यांनी दिल्या.
यावेळी माजी सरपंच व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य संदीप ढेरंगे, किंबर्ली प्रा. लि. च्या कामागर संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुहास दरेकर, कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीचे सदस्य शरद ढेरंगे, स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे, राष्ट्रीय सचिव अमीर इनामदार, प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय गव्हाणे, माजी चेअरमन रामदास ढेरंगे, उद्योजक तानाजी ढेरंगे, हेमंत ढेरंगे, संदीप ढेरंगे, पर्वतराज नाबगे,सतीश गव्हाणे इत्यादी उपस्थित होते.
कामगारांना सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या अडचणींना सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.स्वराज्य पक्षाने जो सन्मान केला त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. मैत्री व एकी अखेरपर्यंत टिकवून ठेवू. – नवनिर्वाचित अध्यक्ष सुहास दरेकर,किंबर्ली कामगार संघटना