Thursday, October 10, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भीमा येथे कचरा टाकणाऱ्याच्या गाडीत तोच कचरा भरण्यात येणार - सरपंच...

कोरेगाव भीमा येथे कचरा टाकणाऱ्याच्या गाडीत तोच कचरा भरण्यात येणार – सरपंच अमोल गव्हाणे

कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक पुलावर व नवीन पुलावर बाहेरच्या कचऱ्याचा ढीग

सुशिक्षित व कामगारांच्या माध्यमातून जमा होतोय कचरा

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील भीमा नदीवरील ऐतिहासिक पुलावर व पुलाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून यामध्ये बाहेरील कामगार व सुशिक्षित नागरिक कामाला जाताना व येताना सदर कचरा टाकत असल्याचे दिसून येत असून याबाबतीत जर कोणी कचरा टाकताना दिसल्यास संबंधितांना सर्व कचरा उचलण्यास लावण्याबरोबच ज्या कंपनीची गाडी कचरा टाकण्यासाठी थांबवणार किंवा तिच्यातील कामगार अथवा इतर कोणी कचरा टाकताना आढळल्यास सर्व कचरा संबधित गाडीमध्ये भरून पाठवण्यात येणार असल्याचा इशारा कोरेगाव भिमा ग्रामस्थांनी दिला आहे.

कोरेगाव भीमा येथील पुल हा ऐतिहासिक पुल असून या पुलाच्या दुतर्फा बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साठका असून यामध्ये मोठ्या प्रमाणात शहरातून व आजूबाजूच्या गावातून कामाला येणारा कामगार वर्ग कचरा टाकत असल्याचे स्थानिकांनी सांगितले तसेच यामध्ये सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. धार्मिक व ऐतिहासिक महत्व असलेल्या भीमा नदीच्या पाण्यामध्ये हा कचरा गाड्या पुलावरून जाताना अथवा पुलाच्या मध्यभागी थांबून पुलावरून कचरा टाकण्यात येत असतो.

यासाठी कोरेगाव भिमा ग्रामस्थ आक्रमक झाले असून संबधित कचरा टाकणारे कामगार अथवा इतर कोणी निदर्शनास आल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याबरोबरच संबंधितांच्या कडून सर्व पुल व दोन्ही बाजू साफसफाई करायला लावून संबधित कचरा त्यांच्या गाडीत भरून पार्सल पाठवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला असून संबंधितांनी कचरा टाकू नये ही विनंती करण्यात आली असून आत्तापर्यंत त्याचा काही परिणाम झाला नाही.यासाठी नाईलाजाने संबधित कचरा साफसफाई व संबंधितांच्या गाडीत कचरा भरण्या शिवाय पर्याय नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी इशारा दिला असला तरी औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी याबाबत स्वतःहून सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे कामगारांची गाडी इतर कुठेही कचरा टाकण्यासाठी थांबणार नाही तसेच जो कामगार कचरा घेऊन येतो त्याला गाडीत प्रवास करण्यासाठी मज्जाव करण्यात यावा यामुळे पुढील संघर्ष टाळता येणार आहे

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक महत्व असलेल्या पुलावर शहरातील व इतर गावातील नागरिक कामाला जाताना कचरा टाकण्याचे मोठे प्रमाण असून यामध्ये सुशिक्षित वर्ग मोठा आहे.संबधित कंपनी कामगार अथवा इतर जे कोणी कचरा टाकणारे असतील त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याबरोबरच सर्व कचरा त्यांच्या गाडीत भरण्यात येणार आहे – सरपंच अमोल गव्हाणे कोरेगाव भीमा

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!