दोन पिल्लांसह बिबट्या जवळच शेतात थांबला असून ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील आनंद पार्कच्या मागील बाजूस असलेल्या शेतामध्ये लोकवस्तीच्या बिबट्या आढळल्याने मोठ्या ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.बिबट्या व दोन पिल्ले आढळली आहेत.यामुळे ग्रामस्थांनी व माजी सरपंच विजय गव्हाणे यांनी वान विभागाने तातडीने पिंजरा बसवण्याची मागणी केली आहे.(Koregaon Bhima – The sighting of a resident leopard in a field behind Anand Park in Koregaon Bhima (T.Shirur) has spread a great deal of fear among the villagers.)
कोरेगाव भीमा येथील आनंद पार्क येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून पुणे नगर हायवे जवळच काही अंतरावर बिबट्या आढळल्याने आश्चर्य व भीती व्यक्त करण्यात येत असून नागरिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण असून बिबट्या लोकवस्तीच्या जवळच आढळल्याने कोरेगाव भिमा पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात आश्चर्य व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या दुपारपासून दोन पिल्लांसह शेतात जवळच थांबला आहे. (A leopard was found near Anand Park in Koregaon Bhima in broad daylight)
आनंद पार्क जवळच काही अंतरावर लक्ष्मण कळूराम गव्हाणे यांच्या शेतात गट नंबर ५०१ मध्ये बिबट्या शेतकरी भयभीत झाले आहेत. बिबट्या दिसल्याने कुत्र्यांच्या मोठ्या प्रमाणात भुंकन्याच्या आवाजाने बिबट्याला पाहिले व त्याचा व्हिडिओ बनवला असून बिबट्या लोकवस्ती जवळ दिसल्याने भीती व्यक्त करण्यात येत आहे.
येथे शाळेसाठी जाणारे विद्यार्थी , कामाला जाणारे कामगार व महिला भगिनी,स्थानिक नागरिक व रहिवासी यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असून कामावर , शाळेत व इतर कामासाठी बाहेर जाण्यासाठी नागरिकांना भीती वाटत असून बिबट्या येतो की काय ? असा भीतीयुक्त प्रश्न नागरिकांना पडत आहे.(A leopard was found near Anand Park in Koregaon Bhima in broad daylight)
कोरेगाव भीमा येथील आनंद पार्क जवळील लोकवस्तीच्या. मागील शेतात बिबट्या आढळल्याने नागरिकांच्या जिविताच्या दृष्टीने काळजी घेत वनविभागाने तातडीने पिंजरा बसवावा. – माजी सरपंच विजय गव्हाणे, कोरेगाव भीमा