कोरेगांव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील विनर्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये बालदिन साजरा करण्यात आला.यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे विश्वस्त अमीर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी इंग्रजी मधून विचार व्यक्त केले छोट्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी इंग्रजी मधून भाषण केले, वेगवेगळ्या गेम्स व स्पर्धा घेण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला.
यावेळी विश्वस्त अमिर इनामदार, विनर्स इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हसे कल्याणी , उपमुख्याध्यापिका तब्बसूम इनामदार शिक्षिका हेमलता जाधव, आयेशा शेख सुजाता सावंत, कविता निकम,अर्चना गवारी, अर्चना अरगडे, अरगडे वैशाली, गिरिजा क्षीरसागर व चारू ऑंटी व सुरेखा ऑंटी उपस्थित होते