Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भीमा येथील वढू चौक रस्त्याच्या बाजूला साठले पावसाच्या पाण्याचे डबके

कोरेगाव भीमा येथील वढू चौक रस्त्याच्या बाजूला साठले पावसाच्या पाण्याचे डबके

एकाच जागी पाणी साठल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती

विद्यार्थी,महिला भगिनी,कामगार वर्ग,व्यापारी व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील मुख्य वढू चौकातील रस्त्याच्या बाजूला जीवन हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल,श्रीराम मेडिकल, श्रीकृष्ण मेडिकल, जीवन मेडिकल, वैष्णवी सुपर मार्केट अशा मुख्य रहदारीच्या ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हॉस्पिटल, मेडिकल व किराणा दुकान, व्यावसायिक दुकाने असल्याने नागरिकांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. कोरेगाव भीमा पंचक्रोशीतील नागरिक विविध कामानिमित्त येथे येत असतात. हॉस्पिटल, मेडिकल येथे उपचारासाठी येत असतात तर येथील नगरातील विद्यार्थी शाळेसाठी , कामगार वर्ग,महिला भगिनी, नागरिकांना साठलेल्या खराब पाण्यातून प्रवास करावा लागत असतो. तसेच कोरेगाव भिमा येथील मुख्य चौकातच असणाऱ्या रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे नागरिक याबाबत चर्चा करत असतात.

या रस्त्यावरून विद्यार्थी,महिला भगिनी,कामगार वर्ग,व्यापारी व नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून नागरिकांना प्रवास खराब पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी साठल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पावसाचे पाणी साठू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!