स्वराज्य राष्ट्र पेपरच्या बातमीची बांधकाम विभागाकडून दखल , नागरिकांनी केला आनंद व्यक्त
कोरेगाव भीमा – दिनांक २ मे कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील पुणे नगर महामार्गालगत पत्रा बसवण्यात आला होता यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता त्यात पुणे नगर महामार्गाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या जिविताच्या सुरक्षिततेसाठी स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेच्या वतीने बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याबाबतीत स्वराज्य राष्ट्र वृत्तपत्राने केलेल्या बातमीची दखल घेण्यात आली असून तातडीने पत्रा काढण्यात आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. याबाबत स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे यांनी समाधान व्यक्त करत बांधकाम विभागाचे व कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांचे आभार व्यक्त केले.
पत्रा काढण्यात आल्याने महामार्गाच्या कडेला असणाऱ्या गुलमोहर व इतर झाडांच्या फुलांनी प्रवाशांना सुखद वाटत असून प्रवास सुखकर होण्याबरोबरच गुलमोहराच्या लाल फुलांचा सडा दिसल्याने या ठिकाणी दुपारी भर उन्हाच्या वेळी प्रवाशी काही क्षण थांबत आहेत. पत्र्याचे कुंपण असल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असलेल्या ठिकाणी झाडांची सावली व प्रवाशांना काही क्षण निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत होत आहेत .
पुणे नगर महामार्गा लगत पत्र्याच्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या बाजूने चालताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करत असत. रात्री कामगारांना तर अत्यंत भीतीच्या व धोक्याच्या सावटाखाली जीव मुठीत धरून प्रवास करावा लागायचा याबत स्वराज्य राष्ट्रच्या बातमीची दखल घेण्यात येऊन पत्रा काढण्यात आल्याने स्वराज्य राष्ट्र पेपरचे नागरिकांनी अभिनंदन केले.
यावेळी स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश सिंह ढेरंगे, रामदास ढेरंगे,रामदास फडतरे,राष्ट्रीय सचिव अमीर इनामदार.दत्तात्रय गव्हाणे नितीन राऊत,सारंग चकोर, मंगेश निक्रड,. अभिजित वारघडे., विशाल ढेरंगे,प्रकाश माळी.,सतीश गव्हाणे . सौकत इनामदार,प्रकाश गव्हाणे,संदीप ढेरंगे उपस्थित होते.