Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भीमा येथील मंडल अधिकारी विकास फुके उत्कृष्ट मंडलाधिकारी पुरस्काराने सन्मानीत

कोरेगाव भीमा येथील मंडल अधिकारी विकास फुके उत्कृष्ट मंडलाधिकारी पुरस्काराने सन्मानीत

कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी केला सत्कार

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील मंडल अधिकारी विकास फूके यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मंडलाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून याबाबत कोरेगाव भिमा येथील नागरिकांनी त्यांचा पुष्प गुच्छ देत सत्कार केला.

कोरेगाव भिमाचे मंडलाधिकारी विकास फुके यांना २०२३ चा महसूल खात्यातील महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मंडलाधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीचे माजी ग्राम पंचायत सदस्य उमेश गव्हाणे, चेअरमन देविदास गव्हाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी अध्यक्ष राजेंद्र गवदे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पोपट गव्हाणे, श्रीरंग काशीद ग्रामस्थ उपस्थित होते.

मंडलाधिकारी विकास फुके हे कोरेगाव भिमा मंडलामध्ये कोरेगाव भीमा, वाडा पुनर्वसन, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, वाजेवाडी, पिंपळे जगताप सज्जा (गावे ) येत असून मोठ्या लोकसंख्येच्या व क्षेत्रफळाच्या गावामध्ये उत्कृष्ट सेवा देत असल्याने नागरिकांनी या पुरस्काराबद्दल विकास फुके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!