Thursday, June 20, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भीमा येथील फ्रेंड्स स्कूल मध्ये फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेचे आयोजन

कोरेगाव भीमा येथील फ्रेंड्स स्कूल मध्ये फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेचे आयोजन

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील फ्रेंड्स एकुकेशन स्कूल मध्ये फरात्या विज्ञान प्रयोग शाळेचे आयोजन करण्यात आले होते .
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, नेहरू सायन्स सेंटर मुंबई व पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी व शहरातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा तळागाळापर्यंत पोहोचाव्यासह विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे या उद्देशाने फिरत्या प्रयोगशाळेचे आयोजन ग्रामीण भागातील शाळांमध्ये मोफत केले जाते.
या फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव दिलीप भोसले, संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे व इतर सर्व संचालक यांच्या हस्ते झाला .

फिरत्या प्रयोग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लहान वयातच वेगवेगळ्या प्रयोगांच्या संधी, वैज्ञानिक प्रयोगाचे प्रात्यक्षिकासह प्रयोग करण्याची संधी तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल त्यानिमित्ताने होऊन त्यांच्या विचारांना चालना मिळते.

फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट फ्रेंड्स नर्सरी प्रायमरी सेकंडरी स्कूल कोरेगाव भीमा प्रशालेत दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचा ११०० विद्यार्थ्यांनी लाभ घेत प्रयोग समजून घेतले.

विज्ञान प्रयोग शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग मोफत पाहण्याची संधी नेहरू सायन्स सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रयोग करता आले ही निश्चितच आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे मुख्याध्यापक मदन हराळ व विज्ञान शिक्षक मारुती दरेकर यांनी मत व्यक्त केले.

यावेळी उपमुख्याध्यापिका अजिताकुमारी नायर, नर्सरी विभागाच्या प्रमुख निमा गव्हाणे ,प्रायमरी विभागाच्या प्रमुख वैशाली वाळुंज, वैशाली धर्माधिकारी प्रियांका फडतरे, सुरेखा भालेराव , व सर्व शिक्षक उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!