Friday, July 26, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भीमा येथील नदीत बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना...

कोरेगाव भीमा येथील नदीत बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश

बुडालेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर डिंग्रजवाडी येथील ढोम वस्तीजवळ तर सापडला मृतदेह

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे पीर साहेब दर्ग्याच्या जवळ नदीकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या (Two teenagers drowned) दोन किशोरवयीन मुले बुडून मृत्यू झाला.मुलांपैकी गौरव स्वामी ( वय १६) या मुलाचा शोध घेतला असून बुडालेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर डिंग्रजवाडी येथील ढोम वस्तीजवळ तो सापडला तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह दुपारी दोन च्या दरम्यान बुडालेल्या स्थळाच्या जवळच सापडले. यावेळी कुटुंबीयांचे दुःख व आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

   कोरेगाव भीमा येथे बंधाऱ्याजवळ पोहण्यासाठी गेलेल्या दोन किशोरवयीन मुले पाण्यात बुडाल्याने नागरिक व प्रशासनाने युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली होती. दिनांक २१ मे रविवारी ४ वाजल्यापासून ही शोध मोहीम सुरू होती.दिनांक २२ मे रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान   बुडालेल्या ठिकाणापासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर  डिंग्रजवाडी येथील ढोम वस्तीजवळ गौरव स्वामी ( वय १६) या मुलाचा मृतदेह सापडला तर अनुराग विजय मांदळे ( वय १६) याचा शोध घेण्याचे काम सुरू होते अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी दोन वाजता जेथे    बुडाले त्याच्या जवळच त्याचा मृतदेह सापडला.
  

यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( PMRDA) वाघोली अग्निशमन केंद्र मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, D.F.O- सुजित पाटील,केंद्र अधिकारी ( वाघोली) विजय महाजन , रेस्क्यू टीम -वाहन चालक – बोट ऑपरेटर – ओंकार पाटील, ज्ञानेश्वर राठोड,फायरमन – उमेश फाळके, सुरज इंगवले, विकास पालवे, प्रकाश मदने, संदीप तांबे यांना दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर दोन मृतदेहांना बाहेर काढण्यात यश मिळाले.
याप्रसंगी सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच संदीप ढेरंगे,माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, ग्रामस्थ तानाजी ढेरंगे, सोनू भोकरे, कुंडलिक ढेरंगे, रुग्णवाहिका चालक सोमनाथ मुळे व पोलीस प्रशासन सहाय्यक पोलीस निरीक्षक पठारे साहेब, कॉन्स्टेबल अशोक केदार यांनी मदतीचे महत्वपूर्ण काम केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!