Friday, July 26, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भीमा येथील दामोदर खैरमोडे नगर मधील महिला भगिनींनी साजरा केला...

कोरेगाव भीमा येथील दामोदर खैरमोडे नगर मधील महिला भगिनींनी साजरा केला श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा

फुलांचा आकर्षक पाळणा सजवत धार्मिक पाळणा व गीते गात श्रीकृष्ण जन्माचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करत वाटला सुंटवडा

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता. शिरूर ) येथील दामोदर नगरमध्ये शिवशंभू प्रतिष्ठाणच्या माध्यमातून महिला भगिनी व नागरिकांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहाच्या,धार्मिक व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी महिला भगिनींनी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याची मोठ्या उत्साहात व आनंदात तयारी करत फुलांचा आकर्षक पाळणा सजवला होता. बालकांनिही अत्यंत उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी महिला भगिनींनी धार्मिक पाळणे व गीते गात श्रीकृष्ण जन्माचे स्वागत केले.तसेच यावेळी उपस्थितांना सुंटवडा व प्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी खैरमोडे नगर परिसरातील मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते.

कोरेगाव भीमा येथील दामोदर खैरमोडे नगर मधील शिवशंभू प्रतिष्ठाण हे सामाजिक बांधिलकी जपत असून मागील चार वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी, मकरसंक्रांत, दिवाळी पाडवा, विजयादशमी सण नागरिक एकत्र येत करत मोठ्या उत्साहात साजरे करत असतात. येथील नागरिकांमधील जिव्हाळा ,प्रेम व आपुलकी ,एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची व एकमेकांच्या मदतीच्या भावनेने हे नगर एक कुटुंब बनले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!