Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भिमा येथील ढेरंगेवस्ती शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची  बिनविरोध निवड 

कोरेगाव भिमा येथील ढेरंगेवस्ती शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची  बिनविरोध निवड 

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील ढेरंगे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीची बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली असून यावेळी अध्यक्षपदी दत्तात्रय ज्ञानेश्वर शिवले यांची तर उपाध्यक्षपदी  सीता भाऊसाहेब ढेरंगे यांची निवड करण्यात आली आहे.

कोरेगाव भिमा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी गोरक्ष सुभाष घावटे, मनीषा सागर ढेरंगे, शीतल किरण ढेरंगे, आशा सुंदरलाल पवार,मनीषा सोनाजी पवणे,रत्नप्रभा ओमप्रकाश बनसोडे, रितेश नारायण पेंदाम, तर शिक्षणतज्ज्ञ पदी संदीप कृष्णा ढेरंगे, ग्राम पंचायत सदस्य शरद ढेरंगे, सचिव दत्तात्रय वाजे, शिक्षक प्रतिनिधी पद्मावती सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून यावेळी माजी सरपंच व  ग्राम पंचायत सदस्य संदीप ढेरंगे, ग्राम पंचायत सदस्य महेश ढेरंगे,रेखा ढेरंगे, कोमल खलसे व शिक्षक सहकारी पूर्व मोरे,अनिता ढमढेरे,कविता जवळकर उपस्थित होते.

   शाळेतील विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!