Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भीमा ते पिंपळे जगताप रस्त्याची दुरावस्था ......शासन आता तरी नागरिकांच्या जीवाशी...

कोरेगाव भीमा ते पिंपळे जगताप रस्त्याची दुरावस्था ……शासन आता तरी नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवणार का?

कोरेगाव भीमा – दिनांक २४ नोव्हेंबर

कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) ते पिंपळे जगताप रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून ,या खराब रस्त्यावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी व नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत असतात पण रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत , दुचाकी वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता असून विद्यार्थी ,कामगार नागरिकांच्या जिविताशी होणारा खेळ आता तरी शासन ,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण थांबवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत वढू बुद्रुकचे माजी सरपंच अंकुश शिवले यांनी पि एम आर डी ए विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांना नागरिकांची समस्या सांगितली त्यानंतर संबधित कॉन्ट्रॅक्टर यांनी भेट दिली पण रस्त्याचे काम काही केले नाही.यावरून पि एम आर डी ए विभागाला रस्त्याची दुरावस्था व नागरिकांच्या अडचणीची कल्पना असून याबाबतीत असे कोणते कारण आहे की अधिकारी संबधित कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून रस्त्याची दुरुस्ती करून घेत नाही की नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा जाणून बुजून प्रयत्न करण्यात येत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अधिकाऱ्यांना आता तरी जाग येईल की नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ पाहत राहणार अस प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरेगाव भीमा ते पिंपळे जगताप या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून संबधित रस्ता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून तीन कोटी अठ्ठ्याहत्तर लाखांचा बनवण्यात आला आहे सदर काम मे सनशाईन व्हेंचर्स पुणे यांनी बनवला असून १०/०९/२०१९ चा कार्यारंभ आदेश असून दोषदायित्व कालावधी काम पूर्ण झाल्यावर तीन वर्षे आहे. याबाबतीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभाग तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पी एम आर डी ए चे अधिकारी जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना रस्ता पि एम आर डी ए विभागात येतो की जिल्हा परिषद विभागात येतो याबाबत निश्चित माहिती नसल्याचे सांगितले तसेच ते गावी याच रस्त्याने जात असतात या रस्त्याच्या दुरावस्थेबाबात त्यांना माहिती असल्याचे सांगितले.

या रस्त्यावर श्री छत्रपती संभाजी हायस्कूल, इम्पेटेट्स प्रायमरी स्कूल, अल अमीन इंजिनियरिंग कॉलेज, शाळा, फार्मसी कॉलेज , कंपन्या व नागरिकांची मोठी वस्ती असून पिंपळे जगताप व कोरेगाव भिमा या गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता असल्याने येथून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते यामुळे पि एम आर डी ए विभागाने तातडीने लक्ष घालून संबधित रस्त्याची दुरुस्ती करण्यात येऊन साईड पट्ट्या वरून दुचाकी मोठ्या प्रमाणात घसरत असून साईड पट्ट्यांना रस्ता बनवला तेंव्हा भरण्यात आले नव्हते त्या भरण्यात याव्या अशी मागणी होत आहे.

यावेळी कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच गणेश गव्हाणे, शेतकरी रवींद्र फडतरे, आनंद फडतरे, प्रकाश गव्हाणे, रमेश साळुंखे उपस्थित होते.

कोरेगाव भीमा ते पिंपळे जगताप रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा तसेच रस्ता बनवल्यावर साईड पट्ट्या भरण्यात आल्या नव्हत्या दोन्ही बाजूने साईड पट्ट्या भरण्यात यावी तसेच रस्ता मंजुरी मिळाल्यानुसार रुंदी व लांबी नुसार बनवण्यात आला असल्याची तपासणी करण्यात यावी – माजी उपसरपंच गणेश गव्हाणे, कोरेगाव भीमा

पिंपळे जगताप येथील रस्त्याची दुरावस्था दाखवताना उपस्थित नागरिकदोन महिन्यांपूर्वी एक शाळेची बस खड्ड्यात गेली होती सुदैवाने त्यात कोणी नव्हते म्हणून अनर्थ टळला, रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पि एम आर डी ए विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली तसेच संबधित कॉन्ट्रॅक्टर येथे पाहूनही गेला पण काम काही होत नाही तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.- माजी सरपंच अंकुश शिवले वढू बुद्रुक

कोरेगाव भीमा ते पिंपळे जगताप या रस्त्याची दुरवस्था झाली आहे याबाबत संबधित विभागाशी संपर्क साधून रस्ता दुरुस्ती बाबत पाठपुरावा करण्यात येईल – सरपंच यशवंत गव्हाणे, सदस्य पि एम आर डी

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!