Friday, June 21, 2024
Homeक्राइमकोरेगाव भीमा येथे ट्रॅव्हल व दुचाकीच्या अपघातात २३ वर्षीय युवक जागीच...

कोरेगाव भीमा येथे ट्रॅव्हल व दुचाकीच्या अपघातात २३ वर्षीय युवक जागीच ठार..

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील वढू बुद्रुक चौकट पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल बस व दुचाकी यांचा अपघात झाला असून स्पोर्ट बाईक वरील तेवीस वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे.याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ट्रॅव्हल चालक सोहन रतनसिंह राठोड यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील फिर्यादी नुसार मिळालेल्या माहिती प्रमाणे , निलगीरी ट्रॅव्हल्समधील चालक सोहन रतनसिंह राठोड (वय ४१ वर्षे) रा. रूपीनगर, निगडी, पुणे (मुळ. उज्जैन ता. पाटी जि. उज्जैन मध्यप्रदेश) निलगीरी ट्रॅव्हल्स नं एम एच १२ एच बी २८५९ ही अहमदनगर वरून पुण्याकडे येत असताना पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास वढु चौकामध्ये वदु बु॥ गावाच्या बाजुने हायवे रोडला एक मोटारसायकल क्रमांक (एम एच २८ बी पी २२८९) चालक प्रतिक सुनिल भुजाडे (वय २३ वर्षे) रा. सध्या अवनी निलय, सोसायटी कोरेगाव भिमा (ता. शिरूर)हा भरधाव वेगात महामार्ग ओलांडताना ट्रॅव्हल्सचे चालकाच्या बाजुचे दरवाजाचे खालील बाजूस असलेल्या टायरचे पुढे धडकला.

मोटार सायकलवरील इसम हा ट्रॅव्हल्सला बाजुला धडकुन हायवे रोडवर पडलेला होता. त्याच्या डोक्याला मार लागून रक्त येत होता. ट्रॅव्हल चालकाने व जमलेल्या लोकांनी त्याला हायवे रोड पासुन बाजुला घेतले असता. त्याची काही एक हालचाल होत नव्हती. तो मयत झाला होता. सदर मोटार सायकल एम एच २८ बी पी २२८९ चालक नाव प्रतिक सुनिल भुजाडे (वय २३ वर्षे ) रा. सधा अवनी निलया सोसायटी कोरेगाव भिमा ता. शिरूर जि. पुणे. मुळ रा. नांदगाव ता. हिंगणघाट जि. वर्धा असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पुणे अहमदनगर हायवे रोडवर वढु बु॥ चौक नगर लेनवर यामाहा कंपीनीची आर वन फाइव्ह मो. सायकल नंबर एम एव २८ बी पी २२८९ वरील मयत चालक प्रतिक सुनिल भुजाडे वय २३ वर्षे रा. सध्या अवनी निलया सोसायटी कोरेगाव भिमा ता. शिरूर (मुळ रा. नांदगाव ता. हिंगणघाट जि. वर्धा) याने त्याच्या ताब्यातील सदर मोटार सायकल ही वाहतुकीचे नियमाकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात बेदरकारपणे चालवुन एम एच १२ एच बी २८५९ हीला चालक बाजुचे दरवाजाचे खालील बाजुस असलेल्या टायरचे पुढील बाजुस मोटार सायकलची ठोस देवुन स्वता:चे डोक्यास गंभीर दुखापत होवुन स्वताःचे मरणास कारणीभुत झाला असल्याबाबत ट्रॅव्हल चालक सोहन राठोड यांनी फिर्याद दाखल केली आहे.सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.

कोरेगाव भीमा येथील अपघाताचे सी सी टी व्ही फुतेज समोर आल्यावर लक्षात येणार खरा प्रकार – कोरेगाव भीमा येथील वढू बुद्रुक चौकातील ट्रॅव्हल व बस अपघातातील सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानंतर खरा प्रकार समोर येणार असून दुचाकी चालक हा ट्रॅव्हल खाली गेला की ट्रॅव्हल चालक याच्या चुकीमुळे दुचाकी चालकाचा जीव गेला हे सत्य समोर येणार असून कोरेगाव भिमा ग्राम पंचायत व चौकातील व्यावसायिकांच्या सी सी टी व्ही फुटेक मधून सत्य समोर येणार आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!