Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भीमा जयस्तंभ अभिवादनासाठी त्याने सायकलवर केला २१०० किलोमिटर प्रवास

कोरेगाव भीमा जयस्तंभ अभिवादनासाठी त्याने सायकलवर केला २१०० किलोमिटर प्रवास

जात तोडो समाज जोडो यासाठी उत्तरप्रदेशातील भीमा भारती या भीम सैनिकाने सायकलवर प्रवास

कोरेगाव भीमा – पेरणे फाटा (ता.शिरूर) येथील जय स्तंभ अभिवादन सोहळ्याला मानवंदना देण्यासाठी उत्तरप्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील एका भीम सैनिकाने सायकलवर २१०० किलोमिटर प्रवास केला असून नागपूर येथील दीक्षाभूमीवर नतमस्तक झाल्यानंतर ३१ डिसेंबरला सकाळी १०.१५ ला जयस्तंभ अभिवादन करण्यासाठी दाखल झाला आहे.

यावेळी त्यांचे जय्यत स्वागत धम्म भंते यांनी केले असून भीमा भारती यांनी उत्तरप्रदेश आग्रा, नागपूर, औरंगाबाद , अहमदनगर, पुणे, कोरेगाव भीमा जयस्तंभ अभिवादन करण्यासाठी दाखल झाला आहे.

जाती अंतासाठी त्याने आपला लढा उभारला असून यासाठी त्याने अनोखा मार्ग अवलंबला आहे.या तरुणाने उत्तरप्रदेश ते कोरेगाव भिमा हा सायकलवर प्रवास करत जाती अंत होऊन समाज जोडला जावा या विचाराच्या समर्थनार्थ जाती तोडो समाज जोडो यासाठी अथक परिश्रम घेतले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!