Friday, June 21, 2024
Homeस्थानिक वार्ताकोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या वतीने पुलाजवळ साफसफाई

कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या वतीने पुलाजवळ साफसफाई

कोरेगाव भीमा – दिनांक २६ जुलै कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील भीमा नदीवरील पुलाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता.या कचऱ्याने पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थी ,महिला व नागरिकांसह प्रवाशांना त्रास ही नये तसेच नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या वतीने कचरा सफाई करणेत आली आहे.

कोरेगाव भीमा येथील भीमा नदीवरील पुलाजवळ दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात कचरा पडत असतो यासाठी प्रामुख्याने शहरातून व इतर गावातून येणारे कामगार व प्रवासी कचरा टाकत असतात. यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा साठतो पेरणे ( ता.हवेली) व कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीला वारंवार काळजी घेत कचरा साफसफाई करावी लागते.

कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या वतीने कचरा सफाई करण्याबरोबरच याठिकाणी सूचना फलक व सी सी कॅमेरा बसवण्यात येणार आहे व कचरा टाकनाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सरपंच अमोल गव्हाणे यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असून यासाठी आम्ही काम करत आहोत. ग्रामस्थांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी ग्राम पंचायत प्रयत्न करत आहे – ग्राम विकास अधिकारी रामराव दवणे, कोरेगाव भीमा

कोरेगाव भीमा हे ऐतीहासिक वारसा असलेले गाव आहे येथील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने आम्ही काळजी घेत असतो.कामगार व प्रवासी यांनी येथे कचरा टाकू नये अन्यथा या लोकांवर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.यासाठी संबधित ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. – सरपंच अमोल गव्हाणे, कोरेगाव भीमा

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!