कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या गलथान कारभाराचा बोजवारा उडाला असून मुख्य चौकात असणारा पथदिवा भरदुपारी सुरू असल्याने. त्यांच्या उदासीन कारभाराचा ग्राम पंचायत लगत असणाऱ्या चौकात दिवसाढवळ्या उजेड पाडला असून याबाबत ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांचे साधे लक्षही नव्हते.
शिरूर तालुक्यातील कोट्यवधीचे उत्पन्न असणारी सधन ग्राम पंचायत म्हणून कोरेगाव भिमा ग्राम पंचायत आता आपल्या गलथान कारभाराचा मुख्य चौकात व ग्राम पंचायत कार्यालया शेजारी असणाऱ्या मोठ्या पथदिव्याचा प्रकाश दिवसाढवळ्या पडत असून या कारभाराला म्हणावे तर काय ?भर दुपारी सुद्धा कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीचे पथदिवा सुरू असल्याने साधा पथदिवा वेळेवर बंद करण्यासाठी ग्राम पंचायतीला फुरसत नाही काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील ग्राम पंचायतीचा मुख्य चौकातील सुरू असलेला मोठा पथदिवा