Thursday, July 25, 2024
Homeसाहित्य/सामाजिककोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने दिवाळी बोनससह ५ लाखाचा विमा उतरवित केली कामगारांची दिवाळी...

कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने दिवाळी बोनससह ५ लाखाचा विमा उतरवित केली कामगारांची दिवाळी गोड


कोरेगाव भीमा – दिनांक २२ ऑक्टोंबर
कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथिल ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या ३२ कामगारांना दिवाळी निमित्त दोन पगार बोनस , मिठाई , कपडे यासह प्रत्येक कामगारांचा पाच लाखाचा विमा उतरविल्याने कामगारांची यावषीर्ची दिवाळी ट्रिपल गोड झाली. विमा उतरविण्यात कामगारांच्या आरोग्याची व भवितव्याची काळजी घेत कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीने अनोखी व अविस्मरणीय भेट कामगारांना दिली आहे. तसेच ४३ दिव्यांगांनाही अपंग विकास निधीतुन प्रत्येकी दहा हजार निधी खात्यावर जमा केल्याचे सरपंच अमोल गव्हाणे व ग्रामविकास अधिकारी रतन दवणे यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या दरवर्षी ग्रामपंचायत कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तु देत असते. आज वसु बारसच्या मुहुर्तावर डबल बोनस , मिठाई , कपडे , व विमा कवच चे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अमोल गव्हाणे , उपसरपंच शैला फडतरे , सदस्य संदिप ढेरंगे , केशव फडतरे , महेश ढेरंगे ,अनिकेत गव्हाणे , विक्रम गव्हाणे , शरद ढेरंगे , गणेश कांबळे , सदस्या वंदना गव्हाणे , मनिषा गव्हाणे , जयश्री गव्हाणे , सविता घावटे , रेखा ढेरंगे , कोमल खलसे , ग्रामविकास अधिकारी रतन दवणे , कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश भांडवलकर , सागर गव्हाणे , विनोद दौंडकर , आनंदा पवार , रमेश वारघडे , मारुती ढेरंगे , समिर जाधव , देवदत्त गव्हाणे , लहु जाधव , महिला कामगार , आशा वर्कर आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंच अमोल गव्हाणे व ग्रामविकास अधिकारी रतन दवणे यांनी सर्व कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा देत गावातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी सर्वोत्कृष्ठ योगदान देण्याचे आवाहन केले.

दिव्यांगांना मिळाला निधी
कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथिल दिव्यांगांचा ५ टक्के अपंग कल्याण निधीतुन ४३ दिव्यांगांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार निधी खात्यावर जमा केल्याने दिव्यांगांचीही दिवाळी गोड केल्याचे सरपंच अमोल गव्हाणे यांनी सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!