Friday, July 12, 2024
Homeकृषिकोरेगाव भीमा करांनी अनुभवला  आमदार अशोक पवार यांच्याशी मनमोकळा संवाद

कोरेगाव भीमा करांनी अनुभवला  आमदार अशोक पवार यांच्याशी मनमोकळा संवाद

सर्वांनाच घालते भुरळ ...कोरेगावची हॉटेल गणेश भुवन मधील लाल मिसळ

आमदार अशोक पवार यांच्याशी  दिलखुलास हास्य , विनोद  गप्पा, गणेश भुवन येथील चहा, नाश्ता आणि शेतकरी भाजी विक्रेत्यांशी संवाद..

कोरेगाव भीमा –  कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे सायंकाळच्या वेळेस रिमझिम, भुरभुर पडणारा पाऊस आणि चहा घेण्यासाठी मित्रांसह जमलेले नागरिक जवळ एक गाडी थांबते त्यातून आमदार अशोक पवार उतरतात नागरिकांसह सर्वांच्या नजरा वळतात समोर आमदार पवार हॉटेल गणेश भुवन मध्ये येतात आणि अगदी सामान्य नागरिकांमध्ये मिसळून मनमोकळा संवाद साधतात नमस्कार.. राम राम .. कसा काय आहे पाऊस पाणी ?   घरी बरे आहे ना ? अशी खांद्यावर हात ठेऊन सर्वसामान्य माणसांची जिव्हाळ्याने व आपुलकीने चौकशी करतात.

 कार्यकर्ते नागरिकांशी आमदार अशोक पवार यांनी मनमोकळा संवाद ,दिलखुलास गप्पा मारत ख्याली खुशाली विचारतात यावेळी सर्वसामान्य माणूस मनातून सुखावला गेला इतकच नाही तर खुद्द आमदार पवार यांनी शेतकरी भाजी विक्रेत्यांशी संवाद साधत शेती शिवार यांची आस्थेने व आपुलकीने चौकशी केल्याने शेतकरी विक्रेते सुखावले. यामुळे आमदार पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू कोरेगाव भीमा करांना अनुभवता आले.

  यावेळी आमदार अशोक पवार यांनी शेतकरी भाजी विक्रेत्यांनी आपुलकीने चौकशी केली. कृषी मध्ये उच्चशिक्षित असलेल्या आमदारांनी  केल्याने शेतकरी आनंदित झाले.

   आमदार अशोक पवार गावामध्ये आल्याचे कळताच अनेक कार्यकर्ते यावेळी जमा झाले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी आमदार अशोक पवार यांच्या बरोबर फोटो काढले , मनमोकळ्या गप्पा मारल्याने सर्वजण समाधानी व आनंदी झाले.

 यावेळी आमदार अशोक पवार यांनी कोरेगाव भिमा येथील हॉटेल गणेश भुवन येथील मिसळ, भजे,वडापाव व मटकी भेळ यांची स्तुती  केली तसेच आज आपली आठवण आली म्हणून बऱ्याच दिवसांनी थांबण्याचा योग आल्याचे सांगितले.

यावेळी माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ ( पि .के .), गव्हाणे माजी सरपंच विजय गव्हाणे, अशोक काशीद, माजी चेअरमन बाबुशा ढेरंगे, विक्रम दौंडकर, महादेव फडतरे,  प्रकाश बाबर, अशोक गव्हाणे ,माजी ग्राम पंचायत सदस्य नंदकुमार शिंदे, सुनील ढेरंगे,  सुनील गव्हाणे, गणेश दौंडकर,, बाळासाहेब ढेरंगे, भाऊसाहेब लोहार, शिवाजी ढेरंगे, सागर गव्हाणे,अक्षय फडतरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सर्वांनाच घालते भुरळ …कोरेगावची हॉटेल गणेश भुवन मधील लाल मिसळ –

    हॉटेल गणेश भुवन म्हणजे लाल मिसळ हॉटेल शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुप्रसिद्ध असणारे व खवय्यांच्या पहिल्या पसंदीचे व विशेष झणझणीत तर्रिबाज मिसळ खणाऱ्यांच्या आवडीचे ठिकाण म्हणजे हॉटेल गणेश भुवन.

१९८० साली सुरू झालेले हॉटेल आजतागायत खवय्यांच्या आवडीचे ठिकाण असून येथील मिसळ व भेळ आवडीने खणाऱ्यांची कायम गर्दी असते. माझी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे,माजी आमदार बापूसाहेब गावडे,माजी आमदार सूर्यकांत पलांडे, कै. माजी आमदार बाबुराव पाचर्णे व अनेक राजकीय मान्यवरांच्या पसंतीला उतरणारी मिसळ असून अभिनेते,गायक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मिसळ  , भेळ, भजी, लाल – पांढरी गोडशेव,पेढे यांची चव चाखली आहे.- महादेव गोपीनाथ फडतरे,मालक हॉटेल गणेश भुवन.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!